India Vs Pakistan Match Anushka Sharma, Singer Arijit Singh arrives in Ahmedabad for World Cup match Esakal
मनोरंजन

India Vs Pakistan Match: भारत-पाकिस्तान सामन्यात कलाकारांची मांदियाळी! अनुष्का, अरिजित पोहचले स्टेडियमवर

Vaishali Patil

India Vs Pakistan Match: सध्या सर्वत्र विश्वचषकाचे वारे वाहत आहेत. त्यातच सर्वांच्या नजरा आजच्या सामन्याकडे लागल्या आहेत. कारण आज भारत आणि पाकिस्तानचा संघ विश्वचषकात आमनेसामने येणार आहेत. आज हा महासामना रंगणार आहे.

हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. देशभरातील सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष आज भारतीय संघाकडे आहे.

हा सामना पाहण्यासाठी सर्व क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. अनेकांनी स्टेडियममध्ये हा सामना पाहण्यासाठी गर्दी केली आहे. दोन्ही संघांमध्ये हा रोमांचक सामना पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटीही अहमदाबादला पोहोचले आहेत.

यात बॉलिवूड अभिनेत्री आणि विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा अहमदाबाद विमानतळावर दिसली. टीम इंडियाला आणि विराटला सपोर्ट करण्यासाठी अनुष्का नरेंद्र मोदी स्टेडियमवर उपस्थीत राहणार आहे.

सध्या सोशल मीडियावर अनुष्का शर्माचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ती काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये विमानतळावर पोहोचली. तर दुसरीकडे अनुष्का आणि सचिन तेंडुलकरसोबतचा फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

त्याचबरोबर प्रसिद्ध गायक अरिजित सिंगही अहमदाबादला पोहोचला आहे. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी तो नरेंद्र मोदी स्टेडियमवर तो त्याच्या सुरेल आवाजात परफॉर्म देणार आहे.

यापुर्वी आयपीएल 2023 च्या ओपनिंग मॅचपूर्वी त्याने याच स्टेडियमवर परफॉर्म केला होता. 12.30 च्या सुमारास अरिजित सिंग, सुनिधी चौहान, शंकर महादेवन आणि सुखविंदर सिंग यांच्यासह अनेक सेलिब्रिटी या कार्यक्रमात परफॉर्म करतील .

भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना दुपारी २ वाजता होणार आहे. डिस्ने प्लस हॉटस्टारवर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा शानदार सामना प्रेक्षक घरबसल्या पाहू शकणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tilak Varma Injury: तिलक न्यूझीलंडविरुद्ध T20 सामन्यांतून बाहेर, वर्ल्ड कपमध्ये खेळणार की नाही? BCCI ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

Pune Election : शहरातील क्रीडा संकुल, शाळा-महाविद्यालयांत मतमोजणी केंद्रे तयार!

Maharashtra Police Foundation Day : "शहर सुरक्षेसाठी पोलिस, नागरिकांचा एकत्रित सहभाग महत्त्वाचा"- अमितेश कुमार!

Congress Manifesto: ‘पुणे फर्स्ट’चा नारा! पुण्यासाठी काँग्रेस काय करणार? जाहिरनाम्यात नेमकं काय?

Pune Traffic : "शहरात ‘कमी खर्चाचे’ वाहतूक व्यवस्थापन यशस्वी; कोंडी निम्म्याने कमी"- अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील!

SCROLL FOR NEXT