Kamal Haasan And S Shankar Starrer Indian 2 Teaser Out  Esakal
मनोरंजन

'Indian 2' intro video Released: लाचखोरांनो सावधान.. तो पुन्हा येतोय !! कमल हासनच्या हिंदुस्तानी 2 चा टीझर रिलिज

Vaishali Patil

Kamal Haasan And S Shankar Starrer Indian 2 Teaser Out: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज कमल हासन सध्या त्याच्या आगामी 'इंडियन 2' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. तब्बल 27 वर्षांनंतर कमल हसन यांच्या 'इंडियन' या चित्रपटाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कमल हसन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे.

'इंडियन 2' हा सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. चित्रपट निर्मातेही प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. काही दिवसांपुर्वी 'इंडियन 2' चे पोस्टर रिलिज करण्यात आले होते आता निर्मात्यांनी 'इंडियन 2' चित्रपटाचा टिझर व्हिडिओ रिलीज केला आहे.

इंडियन 2, एक परिचय असं म्हणत हा व्हिडिओ शेयर करण्यात आला आहे. चित्रपटाचा टीझर पहिला भाग जिथे संपला तिथून हा व्हिडिओ सुरू होतो. कमांडर वचन देतो की भ्रष्टाचार पुन्हा वाढल्यास तो परत येईल आणि त्याने आपले वचन पाळले.

इंडियन 2' सिनेमाचा जास्त भर भ्रष्टाचारावर आहे. मॉन्टेज, घाणेरडे श्रीमंत राजकारणी आणि संघर्ष करणाऱ्या सामान्य लोकांचा छळ यासर्वांवर हा चित्रपट भाष्य करतो. वाढलेला भष्ट्राचार पाहून लोक सोशल मीडिया कमबॅक इंडिया हॅशटॅगने इंडियनला परत येण्याची विनवणी करतात. त्यानंतर एंट्री होते ती कमल हासन यांची. त्यांचा मेकअप आणि त्यांचा पेहराव पाहिल्यानंतर प्रेक्षकांना आपल्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही.

'इंडियन 2' चित्रपटात कमल हसन सिद्धार्थ आणि रकुल प्रीत सिंह यांच्याशिवाय काजल अग्रवाल, प्रिया भवानी शंकर, नेदुमुदी वेणू, गुरु सोमसुंदरम, बॉबी सिम्हा आणि इतर अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. तर इंडियनच्या पहिल्या भागात सुकन्या, मनीषा कोईराला आणि गौंडमणी हे महत्त्वाच्या भूमिकेत होते.

फक्त रजनीकांतच नाही, मल्याळम सुपरस्टार मोहनलाल, कन्नड सुपरस्टार सुदीप, हिंदी सुपरस्टार आमिर खान आणि प्रसिद्ध तेलुगू दिग्दर्शक एसएस राजामौली यांनी त्यांच्या स्वतःच्या भाषेत टीझर शेयर केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT