Fighter 
मनोरंजन

Fighter: फायटरमधील 'त्या' सीनमुळे नवा वाद; हवाई दलाच्या अधिकाऱ्यानं थेट नोटीस पाठवली, काय आहे कारण?

Fighter: दीपिका आणि हृतिकचा किसिंग सीन देखील फायटर या चित्रपटात आहे. आता या सीनमुळे वाद निर्माण झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Fighter: अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोणची (Deepika Padukone) ही जोडी 'फायटर' (Fighter) या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला आली. या चित्रपाटत हृतिक आणि दीपिकाची केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. या चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण दोघेही भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांची भूमिका साकारली आहे. दीपिका आणि हृतिकचा किसिंग सीन देखील या चित्रपटात आहे. आता या सीनमुळे वाद निर्माण झाला आहे.

किसिंग सीनमुळे निर्माण झाला वाद

दीपिकानं फायटर या चित्रपटात स्क्वॉड्रन लीडर मिनल राठौडची भूमिका साकारली आहे. हृतिकनं या चित्रपटात स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानिया ही भूमिका साकारली आहे. दोघे चित्रपटात विविध आव्हानांवर मात करताना दिसतात. तसेच त्यांचा एक लिप लॉक सीन देखील आहे, ज्यामध्ये ते एकमेकांवरील प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत.

भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्याने पाठवली नोटीस

रिपोर्टरनुसार, फायटरमधील किसिंग सीन हा हृतिक आणि दीपिका यांनी वायुसेनेच्या गणवेशात शूट केला आहे आणि भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्याने चित्रपटाच्या टीमला आता कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

भारतीय वायुसेनेच्या एका संघाचा भाग असलेल्या दोन प्रमुख भूमिकांमधील लिप लॉक सीनमुळे वायुसेनेच्या शौर्याचा आणि त्याच्या गणवेशाचा अपमान झाला आहे, असा आरोप फायटर या चित्रपटाच्या टीमवर करण्यात आला आहे, असं म्हटलं जात आहे.

फायटर हा चित्रपट सिद्धार्थ आनंद यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अनिल कपूर करण सिंह ग्रोव्हर यांनी देखील भूमिका साकारली. हा चित्रपट 25 जानेवारी रोजी रिलीज झाला. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटामधील अॅक्शन सीन्सला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT