Indian-American singer Falu's 'Abundance in Millets' song featuring PM Modi nominated for Grammy Awards 2024  SAKAL
मनोरंजन

Grammy Awards 2024: पंतप्रधान मोदींनी लिहीलेल्या गाण्याला ग्रॅमी पुरस्कारात मिळालं नामांकन

पंतप्रधान मोदींनी लिहीलेल्या गाण्याला आंतरराष्ट्रीय ग्रॅमी पुरस्कारात नामांकन

Devendra Jadhav

Grammy Awards 2024 PM Modi: भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट. पंतप्रधान मोदींनी लिहीलेलं 'अबंडन्स इन मिलेट्स' हे गाणे ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 च्या सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणीमध्ये नामांकित झाले आहे.

शुक्रवारी आलेल्या ग्रॅमी अवॉर्ड्स 2024 च्या यादीत 'अबंडन्स इन मिलेट्स'ला नामांकन मिळाल्याची आनंदाची बातमी सर्वांना मिळाली.

जगातील सर्वात प्रतिष्ठित ग्रॅमी पुरस्कार सोहळ्यात एखाद्या राजकीय व्यक्तीला स्थान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. मोदींनी लिहीलेलं हे गाणं बाजरीची लागवड आणि धान्यांची उपयुक्तता यावर भाष्य करते.

जगातील सर्वात प्रतिष्ठित ग्रॅमी नामांकनात कोणत्याही राजकारणी विशेषत: कोणत्याही देशाच्या पंतप्रधानाला स्थान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘अबंडन्स इन मिल्ट्स’ या म्युझिक व्हिडिओमध्ये भारतातील बाजरीची लागवड दाखवण्यात आली आहे.

भूक दूर करण्यासाठी बाजरी किती महत्त्वाची असू शकते हे यावरून दिसून येते. बाजरी हे भरड धान्य आहे आणि पंतप्रधान मोदींनी अनेकवेळा जगभरातील देशांना भरडधान्य पिकवण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.

अॅबडन्स इन मिलेट्स हे गाणे १६ जूनला रिलीज झाले. हे गाणे रिलीज होण्यापूर्वी फाल्गुनी शाहने स्वतः सांगितले की, हे गाणे मी आणि माझे पती गौरव शाह यांनी पीएम मोदींसोबत लिहिले आहे.

त्यांनी सांगितले होते की हे गाणे आंतरराष्ट्रीय बाजरीचे वर्ष साजरे करण्यासाठी तयार करण्यात आले आहे, ज्यामध्ये पीएम मोदी देखील दिसत आहेत. फाल्गुनी उर्फ फालूच्या मते, हे गाणे जगातील भूक कमी करण्यासाठी पौष्टिक धान्यांचे महत्त्व किती आहे, यासंबंधी जागरुकता वाढवते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

AI आणि रोबोट्समुळे नोकऱ्या धोक्यात! बिल गेट्स यांना चिंता; ‘ह्यूमन रिजर्व्ड’चा फॉर्म्युला सुचवला, आरक्षणाची मागणी

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

शिवीगाळ करणाऱ्याला श्वेता तिवारीने शिकवला धडा; शोधून काढत लेखी माफीनामा घेतला

Numerology: गर्दीतही वेगळी ओळख! इतर लोकांपेक्षा वेगळा विचार का करतात 'या' मूलांकाचे लोक? ट्रेंड फॉलो करत नाहीत...

SCROLL FOR NEXT