Indian Army gives NOC to Sunny Deol, Ameesha Patel’s 'Gadar 2 SAKAL
मनोरंजन

Gadar 2 Indian Army: सनी देओलच्या गदर 2 बद्दल भारतीय लष्कराचा महत्वाचा निर्णय, बघा काय आहे प्रकरण

गदर २ सिनेमाविषयी भारतीय सैन्याने महत्वाचा निर्णय दिलाय

Devendra Jadhav

Gadar 2 Indian Army News: सनी देओल - अमिशा पटेल यांच्या गदर २ सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. गदर सिनेमाचा सिक्वेल असणाऱ्या गदर २ सिनेमा पाहण्यासाठी चाहते आतापासूनच उत्सुक आहेत.

अशातच गदर २ सिनेमा बद्दल एक महत्वाची अपडेट समोर येतेय. गदर २ सिनेमाविषयी भारतीय सैन्याने महत्वाचा निर्णय दिलाय. या निर्णयाची सध्या सगळीकडे चर्चा आहे.

(Indian Army gives NOC to Sunny Deol, Ameesha Patel’s 'Gadar 2)

'गदर 2' बद्दल लेटेस्ट अपडेट सांगायचं झालं तर... सनी आणि अमिषाच्या 'गदर 2' या चित्रपटाला भारतीय लष्कराने एनओसी दिली आहे.

वास्तविक, लष्करावर आधारित कोणताही चित्रपट बनवण्यापूर्वी संरक्षण मंत्रालयाच्या पूर्वावलोकन समितीकडून एनओसी घेणे आवश्यक आहे.

त्याशिवाय चित्रपट प्रदर्शित होऊ शकत नाही. अलीकडेच, चित्रपट निर्मात्यांनी लष्करी जवानांसाठी एक विशेष स्क्रीनिंग आयोजित केले होते.

भारतीय लष्कराने चित्रपट पाहिल्यानंतर सनी देओलच्या चित्रपटाला खूप प्रेम मिळाले. संरक्षण मंत्रालयाने प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर लगेचच 'गदर 2'ला ग्रीन सिग्नल दिला.

याशिवाय सर्वांनी या चित्रपटाचे खूप कौतुक केले. याशिवाय सनी देओलला भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. गदर हा सिनेमा 22 वर्षांपूर्वी आलेल्या गदर: एक प्रेम कथा सिनेमाचा दुसरा भाग आहे. गदर 2 ची कथा पहिल्या चित्रपटाशी जोडली गेली आहे.

गदर मध्ये आपण पाहिलं कि निर्मात्यांनी भारत आणि पाकिस्तानची फाळणी दाखवणारी प्रेमकथा सादर केली होती.

आता निर्माते गदर 2 च्या माध्यमातून तीच कथा पुढे नेत आहेत. मात्र, हा चित्रपट ब्रिटीश सैन्यात माजी सैनिक असलेल्या बुटा सिंग यांच्यावर आधारित असल्याचेही बोलले जात आहे.

फाळणीच्या वेळी झालेल्या जातीय दंगलीत त्याने वाचवलेली मुस्लिम मुलगी जैनबसोबतच्या त्याच्या दुःखद प्रेमकथेसाठी तो ओळखला जात होता. आता गदर 2 सिनेमा ११ ऑगस्टला रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT