मुंबई - कोरोनाचा कहर संपता संपण्याचे नाव काही घ्यायला तयार नाही. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा विळखा वाढताना दिसतो आहे. त्याला सामोरं जाण्यासाठी आरोग्य प्रशासनानं पूर्ण तयारी केली आहे. मात्र अद्याप कोरोना आटोक्यात राहत नसल्याने सर्वांची डोकेदुखी वाढली आहे. मागील काही दिवसांत बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींना कोरोना झाला आहे. आता टेलिव्हिजनवरील प्रसिध्द शो इंडियन आयडॉलमधील प्रख्यात गायक पवनदीप रंजनला कोरोना झाल्याची बातमी व्हायरल झाली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. सर्वांचा आवडता स्पर्धक म्हणून पवनदीपकडे पाहिलं जातं. आपल्या आवाजानं त्यानं मोठ्या प्रमाणावर वाहवा मिळवली आहे. आता त्याला कोरोना झाल्यान चाहत्यांनी देवाचा धावा सुरु केला आहे.
वास्तविक सध्या परिस्थिती इतकी हालाखीची आहे की मनोरंजन क्षेत्राला अधिक सावधगिरी बाळगावी लागत आहे. कोरोनाचा मोठा फटका मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांना बसला आहे. त्यात अनेक मोठमोठ्या कलाकारांचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वी इंडियन आयडॉल कार्यक्रम होस्ट करणारा आदित्य नारायणलाही कोरोना झाला होता. त्यानं सोशल मीडियावरुन ही माहिती दिली होती. आपल्या संपर्कात आलेल्यांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहनही त्यानं यावेळी लोकांना केले होते. मात्र आता आदित्य रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतला आहे. दुसरीकडे पवनदीप कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानं कार्यक्रमाच्या निर्मात्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या एका रिपोर्टनुसार ही माहिती मिळाली आहे. त्यात त्यांनी पवनदीपला कोरोना झाल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या पवनदीप एका हॉटेलमध्ये क्वॉरनटाईन आहे. त्यानं हॉटेलमधून कार्यक्रमाच्या सर्व भागांमध्ये सहभाग घेतला आहे. त्या रिपोर्टमध्ये असे म्हटले गेले आहे, ज्य़ावेळी पवनदीपला कोरोनाची लक्षणं दिसायला सुरुवात झाली त्यावेळी त्याला क्वॉरंनटाईन राहण्याचा सल्ला देण्यात आला. त्याच्यावर उपचारही सुरु आहेत. त्याच्याबरोबरच्या इतर स्पर्धकांचा रिपोर्ट अजून येणे बाकी आहे.
काही दिवसांपूर्वी त्या कार्यक्रमाचा होस्ट आदित्य नारायणन यालाही कोरोनाची लागण झाली होती. त्यानं सोशल मीडियावरुन ही माहिती दिली होती. आता त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या त्याची जागा दुस-या होस्टनं घेतली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.