Amit kumar  Team esakal
मनोरंजन

Indian Idol 12: स्पर्धकांचे कौतूक करण्याचे तर पैसे मिळतात..

जे वक्तव्य केले त्यामुळे इंडियन आयडॉलबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - प्रसिध्द दिवंगत गायक किशोर कुमार यांचे चिरंजीव गायक अमित कुमार हे सध्या चर्चेत आले आहे.. त्याला कारणही तसेच आहे. टीव्ही चॅनेल वरील प्रसिध्द रियॅलिटी शो इंडियन आयडॉल च्या १२ व्या सीझनमध्ये पाहुण्या परिक्षकाची भूमिका पार पाडणा-या अमितजींनी सोशल मीडियावर एक धक्कादायक खुलासा केला आहे. त्यामुळे या कार्यक्रमाच्या प्रेक्षकांना नवल वाटले आहे. इंडियन आयडॉल सारख्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अशाप्रकारच्या गोष्टी समोर येत असतील तर आम्ही काय करायचे अशा शब्दांत चाहत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. अमित यांच्या वक्तव्यावर त्या शो चा होस्ट आदित्य नारायणननं एक पोस्ट व्हायरल केली आहे.

एकीकडे इंडियन आयडॉल सारख्या कार्यक्रमांची लोकप्रियता वाढत असली तरी त्यावर होणारी टीकाही वाढली आहे. काही दिवसांपूर्वी बॉलीवूडमधील प्रसिध्द दिवंगत गायक किशोर कुमार यांना श्रध्दांजली देण्यासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला खास परिक्षक म्हणून अमित कुमार यांना बोलवण्यात आले होते. त्या दरम्यान जे वक्तव्य केले त्यामुळे इंडियन आयडॉलबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अमितजी म्हणाले होते की, आम्हाला स्पर्धकांचे कौतूक करण्याचे तर पैसे मिळतात. त्यामुळे आम्ही त्यांचे मोठ्या प्रमाणावर कौतूक करतो. अमितजी अशाप्रकारच्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते.

अमितजींच्या या वक्तव्यामुळे त्यांना ट्रोलिंगचाही सामना करावा लागला आहे. त्यावर त्या कार्यक्रमाचा होस्ट आदित्य नारायण याने प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला, तर अमित कुमार यांना त्या शो मध्ये सहभागी होण्यास काही अडचण होती तर त्यांनी तसे सांगायला हवे होते. दुसरा मुद्दा म्हणजे त्यांना काही गोष्टी खटकल्या होत्या तर शुटिंगच्यावेळी निदर्शनास का नाही आणून दिल्या असा प्रश्न आदित्यनं विचारला आहे.

मी अमितजींचा आदर करतो. ते एक लिजंड गायकही आहेत. मात्र एक ते दोन तासांमध्ये ट्रिब्युट देणं तितकसं सोपं काम नाही. मात्र असे असतानाही आम्ही प्रयत्न केला होता. आताच्या परिस्थितीत जे काही केले ते मोठं काम होतं असं मला म्हणायचं आहे. या शब्दात आदित्यनं आपली भावना व्यक्त केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अकरावी प्रवेशाची उद्या पहिली गुणवत्ता यादी! विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर येणार मेसेज; १२.५१ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी, प्रत्येक फेरीपूर्वी नावनोंदणीची संधी

Vaibhav Sooryavanshi ओपनर, सोबतीला कोण? IPL 2026 मधील अनकॅप्ड खेळाडूंची प्लेइंग इलेव्हन, तगड्या संघाला देईल टक्कर...

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातून वाहनधारकांसाठी दिलासादायक बातमी

Fishing Ban: मच्छीमारांसाठी महत्त्वाची बातमी! महाराष्ट्रात मासेमारी बंद राहणार; महायुती सरकारचा मोठा निर्णय

Loni Kalbhor Crime : बारावीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर अल्पवयीन मुलाकडून वारंवार अत्याचार; मुलाविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT