nachiket lele 
मनोरंजन

Indian Idol 12 : नचिकेत लेले बाद झाल्याने नेटकरी संतापले; निर्मात्यांवर पक्षपातीचा आरोप

स्वाती वेमूल

'इंडियन आयडॉल १२' हा रिअॅलिटी शो सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला असून लवकरच प्रेक्षकांना या पर्वाचा विजेता मिळणार आहे. टॉप १० स्पर्धकांपैकी कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये सूत्रसंचालक आदित्य नारायणने सर्वांत कमी मतं मिळालेल्या तीन स्पर्धकांची नावं जाहीर केली. यामध्ये नचिकेत लेले, सवाई भट आणि मोहम्मद दानिश यांचा समावेश होता. या एपिसोडमध्ये अभिनेत्री नीतू कपूर यांची खास उपस्थिती होती. तिघांपैकी सर्वांत कमी मतं मिळालेल्या नचिकेत लेलेला रविवारी हा शो सोडावा लागला. मात्र या एलिमिनेशन प्रक्रियेवर इंडियन आयडॉलचे प्रेक्षक खूप नाराज झाले आहेत. नचिकेतच्या जाण्यावरून सोशल मीडियाद्वारे कार्यक्रमांच्या निर्मात्यांवर निशाणा साधला जातोय. कार्यक्रमाचे परीक्षक आणि निर्माते यांनी सवाई आणि नचिकेत यांच्यात पक्षपात केल्याचा आरोप नेटकरी करत आहेत. 

नचिकेत लेले या शोमधून बाहेर पडताच वाहिनीकडून सोशल मीडियावर त्याचा फोटो पोस्ट करण्यात आला. त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा, अशा आशयाची पोस्ट लिहिण्यात आली. मात्र त्यावरच अनेकांनी निर्मात्यांना ट्रोल केलंय. अनेकांनी नचिकेतला कार्यक्रमात पुन्हा आणण्याची मागणी केली आहे. परीक्षकांचा निर्णय अयोग्य असल्याचा ठपका नेटकऱ्यांनी लावला आहे. 

कोण आहेत टॉप ९ स्पर्धक?
आता टॉप ९ स्पर्धकांमध्ये चुरस रंगली आहे. यामध्ये मोहम्मद दानिश, षण्मुख प्रिया, सवाई भट्ट, आशिष कुलकर्णी, निहाल तारो, अरुनिता कांजिलाल, पवनदीप राजन, सायली कांबळे आणि अंजली गायकवाड यांचा समावेश आहे. या सर्वांमध्ये पवनदीप सर्वांत तगडा स्पर्धक मानला जातोय. त्यामुळे आता पर्वाचं विजेतेपद कोण पटकावणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Surendra Koli : निठारी प्रकरणात निर्दोष मुक्त सुरेंद्र कोलीने जीवन संपवले; २१ वर्षांच्या तुरुंगवासानंतर पुन्हा सुरू केले होते सामान्य आयुष्य

६ वर्षांपासून क्लार्क, पण टायपिंग टेस्टमध्ये तीनदा फेल; जिल्हाधिकाऱ्यांनी डिमोशन करत शिपाई बनवलं

Pune Bus Blaze: शिवाजीनगर चौकात पीएमपी बसला अचानक आग; अग्निशामक जवानाच्या सतर्कतेने प्रवाशांचे प्राण वाचले

Pune Illegal PG Hostels : लोहगावमध्ये ११ बेकायदेशीर पीजी हॉस्टेल सील; विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणाऱ्या जागामालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश

Gambling Raid : गंगापूरमध्ये रम्मी जुगार अड्ड्यावर धाड; १.९२ लाखांचा मुद्देमाल जप्त, तिघांसह चौघांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT