Indian Idol fame Nitin Kumar father died on the spot after being hit by a car while crossing the road  SAKAL
मनोरंजन

Nitin Kumar: रस्ता ओलांडताना गाडीने धडक दिली, इंडियन आयडॉल फेम प्रसिद्ध गायकाच्या वडिलांचा जागीच मृत्यु

इंडियन आयडॉल फेम गायकाच्या वडिलांचं अपघातात निधन झालंय

Devendra Jadhav

Nitin Kumar Father Death News: इंडियन आयडॉल या लोकप्रिय शोमधील गायक नितीन कुमारच्या वडिलांचा अपघातात दुर्दैवी मृत्यु झालाय. या घटनेसंबंधी पोलिस स्टेशनमध्ये FIR दाखल करण्यात आलाय.

रस्ता ओलांडताना समोरुन येणाऱ्या ट्रकने नितीन कुमारच्या वडिलांना धडक दिली. आणि या घटनेत त्यांना त्यांचा जीव गेला. सविस्तर घटना काय घडली पाहा.

कशी घडली ही दुर्दैवी घटना?

नवभारत टाईम्सनुसार, नितीन कुमार इंडियन आयडॉल 10 मध्ये झळकला होता. त्याचे वडील राजेंद्र बबलू 5 नोव्हेंबर रोजी त्यांची कार (HP19F-0634) घेऊन आले. गाडी बाजूला पार्क करून राजेंद्र यांनी ढाब्यावरून सामान घ्यायला सुरुवात केली.

सामान घेऊन राजेंद्र परत कारच्या दिशेने जाऊ लागताच मागून भरधाव वेगात आलेल्या जीपने (UP13CT-7644) राजेंद्र बबलूंना धडक दिली. जीपची जोरात धडक बसल्याने राजेंद्र रस्त्यावर पडले. या घटनेने जीपचालक घाबरुन घटनास्थळावरून पळून गेला.(Latest Marathi News)

जीपचालकाविरोधात गुन्हा दाखल

या घटनेचे फिर्यादी इरफान खान यांनी सांगितले की, "पळालेला आरोपी लांबा सेलकडे धावला. ही घटना बघताच त्यांनी जखमी झालेल्या राजेंद्र यांना रुग्णालयात नेले. आरोपी जीप भरधाव वेगात आणि निष्काळजीपणे चालवत होता, त्यामुळे हा अपघात झाला."

या प्रकरणी आता जीपचालकाविरुद्ध आयपीसीच्या कलम २७९, ३३७ आणि मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १८७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT