man udu udu zala  
मनोरंजन

मराठी मालिकेतील ग्रँड प्रपोजल; 'मन उडू उडू झालं'चा खास एपिसोड

इंद्रा दिपूला चक्क आकाशाला गवसणी घालत प्रपोज करणार आहे.

स्वाती वेमूल

झी मराठी वाहिनीवरील 'मन उडू उडू झालं' (Man Udu Udu Zala) या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ही मालिका अल्पावधीत त्यांची आवडती बनली असून त्यातील व्यक्तिरेखा देखील प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. मालिकेचं कथानक आणि इंद्रा दिपूची जोडी याला प्रेक्षकांनी पसंती दर्शवली आहे. नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की सानिका आणि कार्तिकच्या नात्याला देशपांडे सरांचा विरोध असल्यामुळे ते सानिकाचं एका चांगल्या मुलासोबत लग्न लावून द्यायचं ठरवतात आणि तिच्यासाठी इंद्रजित साळगावकरच स्थळ सुचवतात.

एकीकडे इंद्रा दिपूचा होकार मिळवण्यासाठी झुरतोय तर दुसरीकडे दिपू त्याला देशपांडे सरांचं ऐकून सानिकाशी लग्न करायला भाग पडतेय. पण इंद्रा हार मानणाऱ्यातला नाही. त्यामुळे त्याने दिपूचा होकार मिळवण्याचं मनाशी पक्क केलं आहे. इंद्रा स्टाईलमध्ये तो जेव्हा गोष्टी करतो तेव्हा त्या खूप ग्रँड असतात. त्यामुळे इंद्रा जेव्हा दिपूला प्रपोज करेल तो क्षण किती ग्रँड असेल याची प्रेक्षक कल्पनासुद्धा करू शकत नाहीत. इंद्रा दिपूला चक्क आकाशाला गवसणी घालत प्रपोज करणार आहे.

इंद्रा दिपूला हॉट एअर बलूनमध्ये प्रपोज करणार आहे. हा प्रसंग चित्रित करताना इंद्रा आणि दिपूने आकाशाला गवसणी घालत १५० फुटावर चित्रीकरण केलं. आजपर्यंत कुठल्याच मराठी मालिकेत इतका ग्रँड सीन शूट झाला नाहीये. इंद्राने इतक्या अनोख्या पद्धतीने प्रपोज केल्यावर दिपू त्याला होकार देईल का, दिपू इंद्राच्या प्रेमाचा स्वीकार करून त्याची साथ देईल का, हे प्रेक्षकांना पुढील आठवड्यात पाहायला मिळेल. इंद्रा आणि दिपू यांच्या आयुष्यातील हा खास व महत्वाचा क्षण प्रेक्षकांना मंगळवारी २५ जानेवारी रोजी संध्याकाळी ७.३० वाजता झी मराठी वाहिनीवर पहायला मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT