instagram viral song of 2023 what jhumka chaleya marathi pori jamal kudu animal jhimma 2 SAKAL
मनोरंजन

Look Back 2023: इन्स्टाग्रामवर २०२३ मध्ये 'ही' गाणी झाली प्रचंड व्हायरल, तुमचं आवडतं गाणं कोणतं?

या गाण्यांनी २०२३ वर्ष गाजवलं

Devendra Jadhav

Look Back 2023 Viral Songs: २०२३ वर्ष काहीच दिवसात प्रेक्षकांचा निरोप घेईल. या वर्षात प्रेक्षकांना अनेक नवनवीन हिंदी - मराठी सिनेमांची मेजवानी म्हणाली. यावर्षी अनेक गाणी इन्स्टाग्रामवर चांगलीच व्हायरल झाली.

या व्हायरल गाण्यांवर अनेक रिल्स व्हिडीओ नेटकऱ्यांनी बनवले. बघूया २०२३ मध्ये इनस्टाग्रामवर व्हायरल झालेली गाणी कोणती?

शाहरुख खानच "चलेया"

बॉलीवूडचा किंगखान शाहरुखने त्याच्या ब्लॉकबस्टर चित्रपट जवान मधील "चलेया" या गाण्याने प्रेक्षकांची मन जिंकली. अनिरुद्ध रविचंदरचे संगीत आणि कुमार यांच्या गीतांसह अरिजित सिंग आणि शिल्पा राव यांनी या भावनिक गाण्याचं सादरीकरण केलं आहे.

नॉस्टॅल्जिया आणि कौतुकाची एक अनोखी पर्वणी देणारं गाणं आहे. उल्लेखनीय म्हणजे या गाण्याने YouTube वर 249 दशलक्ष व्ह्यूज मिळवले आहेत.

बाईपण भारी देवा

केदार शिंदे दिग्दर्शित बाईपण भारी देवा सिनेमा यावर्षी प्रचंड गाजला. या सिनेमाचं टायटल सॉंग प्रचंड व्हायरल झालं. अनेक महिलांनी यावर रिल्स व्हिडीओ करुन सोशल मीडियावर अपलोड केले. मंगळागौरीच्या कार्यक्रमात अनेक ठिकाणी हमखास हे गाणं वाजलं.

विकी कौशलचं "तेरे वास्ते"

विकी कौशलने त्याच्या 'जरा हटके जरा बचके' या चित्रपटातील "तेरे वास्ते" च्या सादरीकरणाने इंस्टाग्रामवर जोरदार चर्चा रंगली. शादाब फरीदी आणि अल्तमश फरीदी यांच्या कोरससह वरुण जैन यांनी गायलेले हे गाणे आणि सचिन- जिगर यांच्या संगीताला यूट्यूबवर ३१३ दशलक्ष व्ह्यूज मिळाले आहेत. अमिताभ भट्टाचार्य यांनी या गाण्याच्या ओळी लिहिल्या आहेत.

रणवीर - आलियाचं "व्हॉट झुमका"

रणवीर सिंगच्या "रॉकी ​​और रानी की प्रेम कहानी" मधील "व्हॉट झुमका" या गाण्याला इंस्टाग्रामवर 222 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. आलिया - रणवीर यांनी केलेला डान्स चांगलाच व्हायरल झाला, युजर्सनी त्यावर अनेक रील्स तयार केल्या.

बॉबी देओलचं जमाल कुडू

अॅनिमल सिनेमातलं जमाल कुडू हे गाणं प्रचंड व्हायरल झालं. या गाण्याची युट्यूब शॉर्टस, इन्स्टाग्रावर चांगलीच हवा आहे. या गाण्यावर सुद्धा अनेक तरुणांनी रिल्स बनवले आहेत.

अनेकांनी अॅनिमलमधील बॉबी देओलसारखी वेशभुषा परिधान करुन डान्स केला. हे रिल्स सध्या चांगलेच व्हायरल झाले.

झिम्मा 2 मधलं मराठी पोरी

हेमंत ढोमे दिग्दर्शित नोव्हेंबर २०२३ मध्ये रिलीज झालेला झिम्मा २ सिनेमा चांगलाच गाजला. अजूनही सिनेमा हाऊसफुल्ल गर्दीत सुरु आहे. या सिनेमातलं मराठी पोरी हे गाणं इन्स्टावर तुफान ट्रेंड झालं. अनेक मराठी अभिनेत्रींनी सुद्धा या गाण्यावर व्हिडीओ बनवले. याशिवाय लहानांपासून मोठ्यांपर्यंत महिला वर्गाने या गाण्यावर रिल्स बनवले

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indra Nooyi India Remarks : भारत घाण देश, तिथे असते तर पेप्सिकोची सीईओ कधीच झाले नसते... इंद्रा नूयी यांनी गायले चीनचे गोडवे

Kolhapur News : आबाजीच गोकुळचे ‘बाप’, अरुण डोंगळेंच्या विधानाने नव्या वादाला तोंड; दूध उत्पादक सभासदांना कमी लेखण्याचा प्रकार

Croatia vs Portugal : ख्रिस्तियानो रोनाल्डो स्वप्नपूर्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे जाणार की स्वप्नांचा चुराडा होणार? दोन दिग्गजांची कसोटी

Shadu Idols : शाडूच्या मूर्तीबाबत अडचण काय? POP वर सरसकट बंदी नको, राज्य सरकारचा विरोध; शाडूच्या मूर्तीला अडचण काय? हायकोर्टाची विचारणा

Navi Mumbai News : नवी मुंबईत गर्भवतीचा उपचारादरम्यान मृत्यू, दुसरी गंभीर; चौकशी समिती नियुक्त

SCROLL FOR NEXT