international celebrity mia khalifa tweet on farmers protest says what in the human rights violations tweet viral  
मनोरंजन

मिया खलिफा शेतक-यांच्या पाठीशी; बॉलीवूड कलाकारांच्या तोंडात बोळा

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई - एकीकडे बॉलीवूडमधील काहीजणांनी शेतकरी आंदोलनावर गप्प राहत असताना दुसरीकडे हॉलीवूड स्टार शेतक-यांच्या समर्थानार्थ सोशल मीडियावर पोस्ट शेयर करुन सर्वांचे लक्ष वेधूव घेत आहे. मिया खलिफाची वेगळी ओळख सांगण्याची काही गरज नाही. तिचे चित्रपट कोणते हे तिच्या चाहत्यांना माहिती आहे मात्र ज्यापध्दतीनं मिया खलिफानं शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला आहे त्यानंतर ती कमालीची लोकप्रिय झाली आहे. मिया आता व्टिटरवर ट्रेंडिंग होत आहे. यावरुन तिच्या नावाभोवती असलेलं ग्लॅमर लक्षात येईल.

प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावर शेतकरी बांधवांचा एल्गार सर्वांना माहिती आहे. गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी बांधव शेतीविषयक विधेयकाला विरोध करण्यासाठी दिल्लीत ठाण मांडुन आहेत. कडाक्याच्या थंडीतही त्यांनी आपला निर्णय बदलेला नाही. सरकारशी वेळोवेळी चर्चा करुनही त्यातून काही साध्य न झाल्यानं शेतक-यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्याचे पडसाद बॉलीवूडमध्ये उमटले आहेत. अभिनेत्री कंगणानं पहिल्यापासून शेतकरी आंदोलनाविरोधात भूमिका घेतली आहे. तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होताना दिसत आहे. अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांज यानेही शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठींबा दिला आहे. मात्र इतर दिग्गज अभिनेत्यांनी आंदोलनाविरोधात कुठल्याही प्रकारची भूमिका घेतलेली नाही.

मियानं जाहीरपणे शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिला आहे. तिनं सोशल मीडियावर आपण शेतक-यांच्या पाठीशी आहोत असे म्हटले आहे. यापूर्वीही रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांनीही शेतकरी आंदोलनाला पाठींबा दिल्यानं सगळ्यांचे लक्ष त्याकडे वेधले गेले आहे. आता पॉर्न स्टार मिया खलिफाच्या पाठींब्यानं तिच्या चाहत्यांनी तिचं कौतूक केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रेटी सोशल मीडियावर शेतक-यांच्या आंदोलनाविषयी पोस्ट करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकी गायिका रिहाना, सोशल अॅक्टिव्हिस्ट ग्रेटा थनबर्गनेही आंदोलनाला पाठींबा दिला आहे.

आता मियानं आपणही शेतकरी आंदोलनाला पाठींबा देत असल्याचे सांगितले आहे. मियानं म्हटले आहे की, सध्या पुरस्कारांची चलती आहे.त्यात त्यांनी यावेळी घेतलेली भूमिका लक्षात ठेवली जाईल. मी मात्र शेतक-यांच्या पाठीमागे उभी असल्याचे मियानं म्हटलं आहे. 
 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महाराष्ट्रात आता रेस्टॉरंटमध्ये बाटलीबंद पाणी खरेदीची सक्ती नाही; FDA कडून आदेश लागू, नवीन नियम नेमके काय आहेत?

IND vs IRE 1st T20I Live: वैभव सूर्यवंशीला का नाही खेळवले? श्रेयस अय्यर बघा काय म्हणाला; आमच्याकडे अनुभवी खेळाडू आहेत अन्...

रोज केस धुवू शकत नाही म्हणून... केसांसाठी 'हा' शॅम्पू वापरते प्राजक्ता गायकवाड; स्वतः सांगितलं नाव आणि उपयोग

Mahanagar Gas Limited: 90 दिवसांत PNG घ्या, नाहीतर LPG बंद! मुंबईकरांसाठी महत्त्वाची सूचना

IND vs IRE 1st T20I Live: वैभव सूर्यवंशीचे पदार्पण झाले का? श्रेयस अय्यरच्या निर्णयाने सारे चकीत... पाहा भारताची प्लेइंग इलेव्हन

SCROLL FOR NEXT