Internet is going crazy Over Taimur Ali Khans Pics from Armaan Jains Wedding 
मनोरंजन

मामाच्या लग्नात भाच्याची चर्चा, तैमुरचा स्वॅग पाहाच !

वृत्तसंस्था

मुंबई : बॉलिवूडमध्ये जितकी चर्चा कलाकारांची आहे तेवढीच किंबहूना अधिक चर्चा त्यांच्या मुलांची म्हणजेच स्टार किड्सची आहे. त्यातच जर सर्वाधिक पसंती असलेला आणि वयाच्या तीसऱ्या वर्षीच फेमस असलेला स्टार किड म्हणजे तैमुर अली खान. करीना आणि सैफ अली खानचा मुलगा तैमुर इंटरनेट सेंसशन आहे. तैमुरची एक झलक टिपण्यासाठी पॅपराझीही धडपड करत असतात. तैमुरच्या फोटोंपासून ते अगदी त्याच्या कपड्यांपर्यंत सर्व काही सोशल मीडियावर ट्रेंड होत असतं. त्याच्या मामाचं म्हणजेच अरमान जैनचं लग्न झालं मात्र त्यातही तैमुरच्या स्वॅगने सर्वांच लक्ष वेधून घेतलं. 

कपूर घराण्यात सध्या 'शादी सिझन' सुरु आहे. करीना कपूर खान आणि करिश्मा कपूर यांचा भाऊ अरमान जैन याचं लग्न पार पडलं आहे. अरमान जैन आणि अनिस्सा मल्होत्रा हे लग्नबंधनात अडकले आहेत. अभिनेते राज कपूर यांचा अरमान नातू आहे. तर, करिश्मा आणि करीनाचा तो आत्येभाऊ आहे. सध्या या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. मेहेंदी, हळद, संगीत अशा कार्यक्रमांचे कपूर घराण्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. 

यामध्ये छोटा तैमुर कसा मागे राहणार ? मामाच्या लग्नात तोही तयार होऊन आनंद लुटतो आहे. खरंतर लग्न आहे मामाचं पण, चर्चा होतेय ती भाचा तैमुरचीच ! तैमुर मामाच्या लग्नात नाचतो आहे त्याचे व्हिडीओ आणि फोटोंनी चाहत्यांचे मन जिंकले आहे. शिवाय मम्मा करीनासोबत त्याने फोटोशूट केले ज्यामध्ये हा पठ्ठ्या पोस देतो आहे. यामध्ये करीना पिवळ्या रंगाच्या साडीमध्ये, काळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये डॅडी सैफ आणि निळ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये तैंमुर भाव खाऊन गेलाय. 

अरमान जैन हा राज कपूर यांची कन्या रिमा जैन यांचा मुलगा आहे. अरमान व अनिसा हे लहानपणापासून एकमेकांना ओळखतात. गेल्या चार वर्षांपासून हे दोघं डेट करत आहेत. गेल्या वर्षी अरमानचा साखरपुडा पार पडला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT