Ira Khan-Nupur Shikhare Wedding: Esakal
मनोरंजन

Ira Khan-Nupur Wedding: आमिरचा बंगला नववधूसारखा सजला! लेकीच्या लग्नाची जय्यत तयारी; आज रंगणार मेंहदी समारंभ

इरा खान तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधणार आहे.

Vaishali Patil

Ira Khan-Nupur Shikhare Wedding: सध्या बॉलिवूड अभिनेता आमिर खान हा त्याची लेक इरा खानच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत आहे. लवकरच इरा खान तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधणार आहे. दोघांच्या लग्नाची तयारी सुरु झाली आहे. इरा अन् नुपूरच्या केळवणाचे फोटोदेखील सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

अगदी मराठमोळ्या पद्धतीने दोघांचे केळवण पार पडले. आता दोघांच्या लग्नाच्या तयारीला वेग आला असून आमिरचे घर देखील नववधू सारखे सजले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इरा आणि नुपूरच्या 3 जानेवारी 2024 रोजी लग्नबंधनात अडकणार आहेत. यानुसार आज इरा आणि नुपूरच्या हातावर मेंहदी रंगणार आहे.

पापाराझी पेज विरल भयानीने इरा खानच्या लग्नाच्या ठिकाणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये दिसतेय इरा अन् नुपुर ज्या ठिकाणी लग्न बंधनात अडकणार आहेत ते ठिकाण दिवे आणि रोषणाईने न्हाऊन निघाले आहे. हा व्हिडिओ शेयर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, "हे इराच्या लग्नाचे ठिकाण आहे आणि आज आमिर खानच्या मुलीचे लग्न आहे."

दोघेही महाराष्ट्रीयन पद्धतीने लग्न करणार आहेत. वधू इरा खानचे वडील आमिर खान यांनी त्यांचे मुंबईतील घर सजवले आहे. सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

आमिर खानची मुलगी इरा खान 3 जानेवारी 2024 रोजी तिचा बॉयफ्रेंड आणि फिटनेस ट्रेनर नुपूर शिखरेसोबत लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

आमिरने सांगितले की तिने 3 जानेवारी ही तिच्या लग्नाची तारीख म्हणून निवडली कारण ती या तारखेला ती नुपूरसोबत पहिल्यांदा डेटवर गेली होती. इरा आणि नुपूर 2020 पासून एकमेकांना डेट करत आहेत.

तर मिडिया रिपोर्टनुसार, लग्नानंतर हे कपल 10 जानेवारीला मुंबईत ग्रँड रिसेप्शन देणार आहे. या रिसेप्शनला चित्रपट जगतातील अनेक दिग्गज व्यक्ती येणार असल्याचे बोलले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND VS ENG 2ND ODI: जो रूट भिडला, इंग्लंडला विजय मिळवून दिला! भारताच्या पराभवामुळे मालिकेत १-१ अशी बरोबरी

NEET-UG results: 'नीट'चा निकाल जाहीर; 11.25 लाख विद्यार्थी पात्र; 17 टॉपर्समध्ये महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश

Ashadhi Wari : काटेवाडी अंगणी धावल्या मेंढ्या रिंगणी; तुकोबांच्या पालखीचे भक्तिमय स्वागत; विठ्ठलनामाने दुमदुमला आसमंत

Rohit Sharma : वैभव सूर्यवंशी, इशान किशन अन् तो! रोहितचा उत्तराधिकारी म्हणून BCCI कोणाला संधी देणार? एक खेळाडू जो केव्हापासून संधीच्या शोधात होता...

Junnar Tree Plantation: जुन्नरमध्ये अँड संजयराव काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण; सहकार क्षेत्रातील योगदानाची गौरवमाला

SCROLL FOR NEXT