Aamir Khan Video Esakal
मनोरंजन

Aamir Khan Video: लेकीसाठी आमिरनं गायलं खास गाणं! आयरा दुसऱ्यांदा अडकणार लग्नबंधनात! संगीत सोहळ्याचा व्हिडिओ व्हायरल

आयरा खानचे तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबतच 3 जानेवारी रोजी मुंबईत कोर्ट मॅरेज केले.

Vaishali Patil

Ira Khan-Nupur Shikhare's wedding: सध्या आमिर खानची लेक आयरा खानच्या लग्नाची सर्वत्र चर्चा होत आहे. आयरा खानने तिचा बॉयफ्रेंड नुपूर शिखरेसोबत 3 जानेवारी रोजी मुंबईत कोर्ट मॅरेज केले. आता हे कपल उदपूरमध्ये पारंपारिक रितीरिवाजानुसार लग्न करणार आहे.

7 जानेवारीपासून या जोडप्याचे प्री-वेडिंग फंक्शन्स सुरू आहेत. हे जोडपे वेलकम डिनरपासून मेहंदी आणि पायजमा पार्टीपर्यंत सर्व फंक्शन्स उत्साहाने साजरा करत आहे. काल रात्री आयरा आणि नुपूरचा संगीत कार्यक्रम पार पडला. यावेळी दोघेही पारंपारिक लूकमध्ये कमाल दिसत होते. आयराने या खास संगीत सोहळ्यासाठी रॉयल ब्लू लेहेंगा परिधान केला होता.

आयरा खान आणि नुपुरचा संगीत सोहळा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. आयराने तिच्या संगीत फंक्शनसाठी रॉयल निळ्या रंगाचा लेहेंगा घातला होता त्यावर सिल्व्हर एम्ब्रॉयडरी वर्क होता. तर नुपूर तपकिरी रंगाचा कोट आणि काळी पँट घातली होती. ही जोडी खुपच सुंदर दिसत होती.

तर व्हायरल व्हिडिओमध्ये आमिर खान आणि त्याचा धाकटा मुलगा आझाद गाणे गात आहेत. एका बाजूला आयरा आणि नुपूर सोफ्यावर बसलेले दिसतात. आमिर खान आणि आझाद स्टेजवर बसून 'एक हजारों में मेरी बहना है...' हे गाणे गाताना दिसत आहेत. यावेळी पत्नी किरण रावही त्यांना साथ देताना दिसली.

आयरा अन् नुपुर आज 10 जानेवारीला मराठी पद्धतीने लग्न करणार आहेत. उदयपूरमध्ये लग्नगाठ बांधल्यानंतर आयरा आणि नुपूर 13 जानेवारीला मुंबईत रिसेप्शन पार्टी देणार आहे.

13 जानेवारी रोजी नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरमध्ये भव्य रिसेप्शनचे आयोजन केले जाईल. चित्रपटसृष्टीशिवाय राजकारणी आणि प्रसिद्ध उद्योगपती या रिसेप्शन पार्टीत सहभागी होणार आहेत.

नुपूर शिखरे हा आमिर खानचा ट्रेनर होता. इतकच नाही तर नुपूरने सुष्मिता सेनला फिटनेसचे धडे दिले आहे. यावेळी तो आमिर खानच्या मुलीलाही भेटला. आयराला नैराश्यातून बाहेर येण्यासाठी नूपुरनेही तिची खूप मदत केली.

त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली. त्यानंतर आयरा आणि नुपूरने डेटिंग करायला सुरुवात केली. दोघांनी 2022 मध्ये एंगेजमेंट केले आणि आता लग्न केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vasai: वसईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार! नायगाव खाडीवर दुमजली पूल; वर मेट्रो, तर खालून वाहने धावणार

Ind vs SA T20 World Cup : दोन देशच नाही, तर दोन भाऊ आमनेसामने, मैदानाबरोबरच डगआऊटमध्ये रंगणार सामना

सोलापूर-धुळे मार्गावर भीषण अपघातात तरुण-तरुणीचा जागीच मृत्यू, टाटा नेक्सॉनचा चुराडा

Latest Marathi News Live Update : विरोधकांचा सरकारच्या चहापानावर बहिष्कार

Immunity Boosting Superfoods: वारंवार थकवा आणि सर्दीचा त्रास होतोय? इम्युनिटी बूस्टसाठी खा ‘हे’ एनर्जी देणारे सुपरफुड

SCROLL FOR NEXT