Irrfan Khan Death Anniversary 2023 wife sutapa said his last wish to sing song of amitabh's tum hoti to aisa hota sakal
मनोरंजन

Irrfan Khan Birthday: तुम सदा याद आओगे! दुःख एकच की इरफानची 'ती' इच्छा पूर्ण होऊ शकली नाही..

अभिनेता इरफान खानची आज जयंती

सकाळ डिजिटल टीम

Irrfan Khan Birth Anniversary 2024 : बॉलीवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक अशा इरफान खानची एक्झिट ही त्याच्या चाहत्यांच्या मनाला चटका लावणारी होती. इरफानचा चाहतावर्ग मोठा होता. (Irrfan Khan) त्याला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय होती आणि आजही आहे.

त्याचं अकाली जाणं हे सर्वांना चटका लावणारं होतं. आजही त्याच्या आठवणीनं चाहत्यांच्या डोळ्यात (Bollywood Actor) पाणी आल्याशिवाय राहत नाही, मोठ्या संघर्षाला सामोरं जात इरफाननं (Entertainment news) स्वताची वेगळी ओळख तयार केली होती. तो एक अभिजात कलावंत होता. त्यामुळे केवळ भारतातच नाही तर जगाच्या पाठीवर इरफानच्या अभिनयाचे चाहते होते.

आज त्याची जयंती आहे. इरफानची एक इच्छा मात्र अपूर्ण राहिली होती, जी त्याच्या निधनानंतर त्याच्या पत्नीने सांगितली होती. आज त्याच विषयी जाणून घेऊया..

(Irrfan Khan Birth Anniversary 2024 wife sutapa said his last wish to sing song of amitabh's tum hoti to aisa hota)

अमिताभ बच्चन यांच्या आवाजाचे, व्यक्तिमत्त्वाचे चाहते जगभरात आहेत. दिवंगत इरफान खानही त्यापैकी एक. इरफान खान अमिताभ यांचा मोठा फॅन होता, त्याच्यासाठी बच्चन जी म्हणजे देव होते. त्यांच्या प्रत्येक कलाकृतीवर इरफानचे प्रेम होते.

याच अमिताभजींच्या चित्रपटातील एका गाण्याने इरफानच्या मनात घर केलं होतं. ते गाणं आपणही गावं अशी त्याची इच्छा होती. त्याच विषयी इरफानची पत्नी सुतापा सिकदरने त्याच्या निधनानंतर सांगितले होते.

सुतापाने एक पोस्ट शेयर केली होती ज्यामध्ये त्या म्हणाल्या होत्या, ''आजही त्याच्या आठवणीनं अर्ध्या रात्री झोपमोड होते. फेसबुकवर आजही त्याच्या संदर्भातल्या आठवणींचा पूर ओसंडून वाहतोय. त्यामुळे मलाही इथं इरफानची एक अपूर्ण राहिलेली इच्छा आठवण म्हणून पोस्ट कराविशी वाटतेय.''

''मला आठवतंय की आम्ही जेव्हा विद्यार्थी म्हणून शिकत होतो तेव्हापासून इरफान अमिताभ बच्चन यांच्या आवाजाचा फॅन होता. तो बच्चनजींचे बरेच संवाद हुबेहूब त्यांच्या स्टाईलमध्ये बोलून दाखवायचा. त्यानंतर इंडस्ट्रीत स्टारपद मिळवल्यानंतरही एके रात्री त्यानं मला बोलून दाखवलं,मला बच्चनजींचं सिलसिला सिनेमातलं 'तुम होती तो ऐसा होता' हे गाणं एकदातरी परफॉर्म करायचंय. पण त्याची ही इच्छा अपूर्णच राहिली,तो आपल्यातून निघून गेला". अशी भावनिक पोस्ट त्यांनी केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian student shot in USA : अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या झाडून हत्या!

Rohit Sharma: 'अद्भूत कर्णधार, टीम इंडियाला तू शिकवलंस की...' दिनेश कार्तिकचा रोहितच्या नेतृत्वाला सलाम; पाहा Video

30th Fenesta Open Tennis: महाराष्ट्राच्या वैष्णवी अडकरने जिंकले विजेतेपद; मनिष सुरेशकुमार पुरुष विभागात विजेता

सातारा अन् पालघर जिल्ह्यातील दोन न्यायाधीश सेवेतून बडतर्फ; नेमकं प्रकरण काय?

Phulambri Protest : शेतकऱ्यांच्या मदतीवरून काँग्रेस आक्रमक तहसीलदार व काँग्रेस कार्यकर्त्यांत बाचाबाची

SCROLL FOR NEXT