babil khan 
मनोरंजन

'तू मुलगी आहेस का?'; असं विचारणाऱ्यांना इरफान खानच्या मुलाचं उत्तर

स्वाती वेमूल

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडणारा दिवंगत अभिनेता इरफान खानचा मुलगा बाबिल सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. इन्स्टाग्राम अकाऊंटवर तो अनेकदा वडिलांचे जुने फोटो, व्हिडीओ पोस्ट करत असतो. बाबिलने काही दिवसांपूर्वीच स्वत:चा एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोमध्ये त्याने फेसमास्क लावला होता. हे पाहून तू मुलगी आहेस का, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी बाबिलला ट्रोल केलं. त्या ट्रोलर्सना आता बाबिलने सडेतोड उत्तर दिलं आहे. 

ट्रोलर्सना उत्तर देताना बाबिलने एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिलं, "मी बाहेर जाताना फेस मास्क लावल्याने किंवा मेकअप वापरल्याने लोकं मला खोचकपणे विचारतात की, तू मुलगी आहेस का? पण मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीमध्ये स्त्री आणि पुरुषाचं मिश्रण असतं आणि आपल्यातील स्त्रीला जो ओळखतो तोच खरा पुरुष असतो. तुम्ही खऱ्या अर्थाने पुरुष तेव्हा होता जेव्हा तुम्ही तुमचा खोटा पुरुषी अहंकार सोडून महिलांची बाजू समजून घेता. मला माझ्या त्वचेची काळजी घ्यायला आवडतं, मला सेक्सी दिसायला आवडतं, मला स्त्रियांवर प्रेम आहे आणि माणूस म्हणून माझं स्वत:वरही प्रेम आहे."

बाबिलने व्हॅलेंटाइन डेला इन्स्टाग्रामवर स्वत:चा फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्याने फेसमास्क लावल्याचं दिसतंय. एका मुलाने फेस मास्क लावणं आणि मेकअप करणं या गोष्टी सामान्य नाहीत म्हणत नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलं. इतकंच नव्हे तर तू मुलगी आहेस का, असाही प्रश्न विचारत अनेकांनी त्याची खिल्ली उडवली. मात्र या ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देत बाबिलने त्यांचं तोंड बंद केलं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT