मनोरंजन

ती झाडे अशीच बहरतील! इरफान खानच्या पत्नीने दिला आठवणींना उजाळा

सकाळ वृत्तसेवा


मुंबई ः अभिनेता इरफान खानचे २९  एप्रिल रोजी कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे अख्खी चित्रपटसृष्टी हळहळली. त्यांच्या चाहत्यांनाही खूप दुःख झाले. त्यांचे कुटुंबीय आजही या दुःखातून बाहेर आलेले नाही. त्यांची मुले आणि पत्नी यांना त्यांची आठवण सातत्याने येत असते. आता इरफानच्या आठवणींचा असाच एक फोटो त्यांच्या पत्नीने सोशल मीडियावर शेअर केला. तो फोटो पाहून चाहत्यांनाही त्यांची पुन्हा आठवण झाली.\

दोनेक दिवसांपूर्वी पाऊस झाला. त्यामध्येच पहिल्या पावसाच्या सरी कोसळल्यानंतर इरफानची पत्नी सुतापाने एक फोटो शेअर केला. सुतापाने काही झाडांचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सन 2016 मध्ये इरफानने काही झाडे लावलेली आहेत आणि आता त्या झाडे मोठी झाली आहेत. आता पहिला पाऊस पडला आणि इरफानची पत्नी आणि मुलांनी इरफानची आठवण म्हणून तो फोटो शेअर केला आहे. इरफानचा मुलगा बाबिल सतत इरफानचे विविध फोटो सोशल मीडियावर शेअर करीत असतो. त्यांच्या आठवणींना उजाळा देत असतो. इरफानची पत्नीही फोटो सोशल मीडियावर टाकून काही आठवणी सोशल मीडियाव्दारे शेअर करीत  असते.

आता पहिल्याच पावसात इरफानने लावलेल्या झाडांचा फोटो शेअर करीत तिने कॅप्शनमध्ये म्हटले आहे, की आज किती सुंदर भेटवस्तू मिळाली आहे. तू झाडे लावली. तू गेल्यानंतरही ती अशीच बहरतील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Drought : मुख्यमंत्र्यांसमोर व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याला भाजप आमदाराची धक्काबुक्की? धाराशिवच्या व्हिडिओवरून दानवेंचा गंभीर आरोप

Ballarpur Hospital Incident : प्रसूतीदरम्यान मातेसह बालकाचा मृत्यू बल्लारपुरातील घटना; पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात

Gadchiroli Collector : जिल्हाधिकाऱ्यांनी दुचाकीने केला दौरा दुर्गम भागातील रस्ते, पूल, आरोग्य, शिक्षणासह अन्य सुविधांची पाहणी

Latest Marathi News Live Update : चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत

Edible Oil Import Duty Cut : खाद्यतेलाचे दर उतरणार?, आयात शुल्कात मोठी कपात; सणासुदीत ग्राहकांना मोठा फायदा

SCROLL FOR NEXT