Anil Kapoor  Instagram
मनोरंजन

अनिल कपूर जर्मनीमध्ये आजारावर घेतायत उपचार? व्हिडीओ पोस्ट करत म्हणाले..

व्हिडीओ पाहून चाहत्यांनी व्यक्त केली काळजी

सकाळ डिजिटल टीम

दिलखुलास हसणं, मनमोकळं वागणं आणि बिनधास्त बोलणं यासाठी बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांची वेगळी ओळख आहे. त्यांचा हसरा चेहरा त्यांच्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाची साक्ष पटवून देतो. वयाची साठी ओलांडल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा उत्साह, आणि ऊर्जा तरुणांनाही चकित करणारी आहे. अनिल कपूर हे गेल्या काही दिवसांपासून जर्मनीमध्ये आहेत. त्यांनी सोशल मीडियावर जर्मनी टूरमधील शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी आज ट्रीटमेंटचा शेवटचा दिवस असल्याचं सांगितलं. त्यांचा हा व्हिडीओ पाहून अनिल कपूर यांना नेमकं काय झालं, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

अनिल कपूर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये काळ्या रंगाचा कोट परिधान केला आहे. या व्हिडीओमध्ये जर्मनीमध्ये बर्फ पडत असल्याचं दिसत आहे आणि अशातच अनिल कपूर तेथील रस्त्यांवर फिरताना दिसत आहेत. व्हिडीओच्या बॅकग्राऊंडला ‘रॉकस्टार’ चित्रपटातील ‘फिर से उड चला’ हे गाणं ऐकू येत आहे. हा व्हिडीओ पोस्ट करत त्यांनी लिहिलं, ‘बर्फ पडत असताना एक वॉक. जर्मनीमधील शेवटचा दिवस. डॉ. मुलेर यांना मी आज शेवटच्या ट्रीटमेंटसाठी भेटणार आहे. त्यांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनापासून आभार.’ हे कॅप्शन वाचून अनिल कपूर यांना काय झालं, ते कोणत्या आजाराने त्रस्त आहेत, असे प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

गेल्या वर्षी अनिल कपूर यांनी सोशल मीडियाद्वारे ऍचिलीस टेंडिनाइटिसने (Achilles Tendinkitis) या आजाराने त्रस्त असल्याचं सांगितलं होतं. कोणतीही सर्जरी न करता त्यांनी या आजारावर मात केली होती. आता पुन्हा अनिल कपूर याच आजारावर उपचार घेण्यासाठी जर्मनीला गेले असावेत, असं काहींनी म्हटलं आहे. पण अद्याप याबाबत अनिल यांनी कोणतीही माहिती दिली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT