poonam pandey 
मनोरंजन

पूनम पांडेकडे गोड बातमी?

गेल्या वर्षी पूनमने बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेशी गुपचूप लग्नगाठ बांधली.

स्वाती वेमूल

अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेने Poonam Pandey गेल्या वर्षी बॉयफ्रेंड सॅम बॉम्बेशी Sam Bombay गुपचूप लग्नगाठ बांधली. १ सप्टेंबर २०२० रोजी वांद्रे इथल्या तिच्या घरीच हा विवाहसोहळा पार पडला. लग्नानंतरही ही जोडी सतत विविध कारणांमुळे चर्चेत होती. आता पूनम पांडे ही गरोदर असल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 'झूम' वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तिने या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे. त्याचसोबत गरोदर असल्याची चर्चा खोटी असल्याचंही तिने स्पष्ट केलंय. (Is Poonam Pandey Expecting Her First Child With Hubby Sam)

'मला बळजबरीने गरोदर असल्याचं ठरवू नका. महिलांसाठी ही आनंदाची बातमीच असते. पण माझ्यासाठी ही बातमी आनंदाची नाही. मी गरोदर नाही. माझ्याबद्दल अशा अफवा पसरवण्याआधी किमान एकदा मला विचारून तरी घ्या. माझ्या आयुष्याबद्दलची प्रत्येक गोष्टी ही खुल्या पुस्तकाप्रमाणे आहे. जेव्हा मी गरोदर असेन, तेव्हा मी पेढे नक्की वाटेन', असं पूनम म्हणाली.

काही दिवसांपूर्वीच पूनमने तिच्या पतीविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते. सॅमने तिला मारहाण केल्याची तक्रार तिने पोलिसांत दाखल केली होती. मात्र आता पतीसोबत सर्वकाही ठीक झाल्याचं तिने स्पष्ट केलं. 'आमच्यात आता कोणतेच वाद नाही. मी माझं लग्न मोडण्यापासून वाचवलं. जर एखाद्यावर प्रेम केलं असेल तर तुम्ही इतक्या लगेच साथ सोडू शकत नाही. नात्यात समस्या असतात, पण एक संधी द्यायला हरकत नाही', असं तिने सांगितलं.

पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे यांनी जुलै २०२० मध्ये साखरपुडा केला होता. सोशल मीडियावर बोल्ड आणि हॉट व्हिडीओसाठी पूनम प्रसिद्ध आहे. 'नशा' या चित्रपटातून तिने करिअरची सुरुवात केली. एका शूटिंगदरम्यान तिची सॅमशी पहिली भेट झाल्याचं तिने एका मुलाखतीत सांगितलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG टंचाई टाळण्यासाठी रेल्वेचा मोठा निर्णय! अन्न आता इंडक्शन कुकरवर शिजवणार; स्वयंपाकघरात ‘फ्लेमलेस’ क्रांती

BAN vs PAK : हा, घे बॉल... कर OUT! पाकिस्तानी फलंदाजाचा मुर्खपणा जगाने पाहिला... बाद देताच बांगलादेशच्या खेळाडूला भिडला Video Viral

Uttarakhand Travel Guide: हिमालयात लपलेलं स्वर्गासारखं ठिकाण! चोपटा व्हॅलीला का म्हणतात ‘मिनी स्वित्झर्लंड’?

T20 World Cup गाजवणाऱ्या गोलंदाजाचा पाकिस्तानला ठेंगा! IPL 2026 मध्ये KKR कडून खेळण्यासाठी तयार

Navi Mumbai: ऐरोलीत भीषण अपघात! जेसीबी आणि दुचाकीची जोरदार धडक, दोन तरुणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT