rakhi sawant instagram
मनोरंजन

पती म्हणून राखी सावंतने उभं केलं 'बिग बॉस १५'च्या कॅमेरामनला?

टीआरपीसाठी शोच्या निर्मात्यांचा खेळ?

स्वाती वेमूल

Bigg Boss 15 'बिग बॉस १४' नंतर आता 'बिग बॉस १५'मध्येही 'ड्रामा क्वीन' राखी सावंतने Rakhi Sawant एण्ट्री केली. विशेष म्हणजे यावेळी राखीसोबत तिचा पती रितेशसुद्धा बिग बॉसच्या घरात आला. लग्नानंतर राखीचा पती कधीच माध्यमांसमोर आला नव्हता. तिने लग्नाची अफवा पसरवली आणि लग्न केलंच नाही असं नेटकरी म्हणू लागले होते. मात्र अखेर रितेशने बिग बॉसच्या घरात एण्ट्री केली आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना पूर्णविराम मिळाला. मात्र आता हा रितेश राखी सावंतचा खरा पती नसल्याचं म्हटलं जात आहे. 'झूम टीव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार रितेश हा बिग बॉस १५च्या सेटवरील कॅमेरामन आहे. त्यामुळे राखीने पुन्हा एकदा प्रेक्षकांना फसवल्याचं कळतंय.

"माझं खरंच लग्न झालं आहे आणि अखेर हे जग माझ्या पतीला पाहणार आहे. बिग बॉसच्या घरात मी रितेशसोबत एण्ट्री करणार आहे", असं राखी सावंत म्हणाली होती. बिग बॉसच्या पहिल्या सिझनमध्येही राखीने हजेरी लावली होती. बिग बॉस १४ मध्ये तिने वाईल्ड कार्ड एण्ट्री केली. अंतिम फेरीपर्यंत ती घरात टिकून राहिली. मात्र ऐनवेळी तिने १४ लाख रुपये स्वीकारत अंतिम फेरीतून माघार घेतली. आईच्या उपचाराकरिता पैशांची गरज असल्याचं तिने सांगितलं होतं. मात्र यावेळी बिग बॉसची ट्रॉफी जिंकूनच येणार, असा निर्धार तिने केला आहे. "मी ट्रॉफीवर लटकेन पण ती घरी नक्की आणेन. साम, दाम, दंड, भेद सगळं करेन आणि यावेळी जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करेन", असं ती पुढे म्हणाली. त्यामुळे टीआरपीसाठी बिग बॉसच्या टीमने आणि राखीने मिळून कॅमेरामनला पती म्हणून उभं केल्याचं म्हटलं जात आहे.

राखीने स्वत:च्या लग्नाची अफवा पसरवल्याचा तिच्यावर आरोप झाला होता. या आरोपांवर उत्तर देत ती म्हणाली होती, "रितेश या व्यावसायिकासोबत मी लग्न केलंय असं सांगितलं तेव्हा लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला नाही. मी खोटारडी आहे आणि प्रसिद्धीसाठी अशी वागतेय, असं ते म्हणाले. माझ्याकडे कोणतेही फोटो किंवा व्हिडीओ नव्हते म्हणून ते माझ्यावर विश्वास ठेवत नव्हते. मी माझ्या लग्नालाही कोणाला आमंत्रित केलं नव्हतं. पण आता बिग बॉसमध्ये जेव्हा ही लोकं रितेशला पाहतील तेव्हा त्यांच्या शंका दूर होतील. माझ्या खातर त्याने बिग बॉसमध्ये येण्यास होकार दिला. तो खूप प्रेमळ आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT