Shah Rukh Khan-Ram Charan In Dhoom 4: Esakal
मनोरंजन

Dhoom 4: पुन्हा उडणार धुरळा! जॉन - हृतिक आमिरनंतर आता हा सुपरस्टार 'धूम' ठोकणार?

Shah Rukh Khan-Ram Charan In Dhoom 4: 'धूम 4' बाबत अनेक चर्चा सोशल मिडियावर सुरु आहेत.

Vaishali Patil

Shah Rukh Khan-Ram Charan In Dhoom 4: बॉलिवूडचा किंग शाहरुख खानने यंदाचे वर्ष खुप गाजवले. 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' या तीन बॅक टू बॅक हिट चित्रपटांसह तो बॉलिवूडचा बादशाह असल्याचे पुन्हा सिद्ध केले.

तर आता शाहरुख खान 'पठाण', 'जवान' आणि 'डंकी' नंतर 'धूम 4' मध्ये धमाल करणार आहे अशी चर्चा सोशल मिडियावर सुरु होती.

'धूम 4' बद्दल बरीच चर्चा आहे. शाहरुख खान आणि राम चरण या चित्रपटात एकत्र काम करणार अशा चर्चा होत्या. तर आता इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार या सर्व चर्चा निराधार आहेत. या सर्व अफवा असल्याचे बोलले जात आहे.

तर दुसरीकडे निर्मात्यांनी याबाबत कोणतेही वक्तव्य जारी केलेले नाही. तर दुसरीकडे इन्स्टंट बॉलिवूडने आपल्या इंस्टाग्रामवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे.

ही पोस्ट शेअर करताना instantbollywood ने आपल्या Instagram पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, शाहरुख खान 'धूम 4' मध्ये काम करत असल्याची बातमी चुकीची आहे. रिपोर्टनुसार, सध्या या चित्रपटावर काम सुरू आहे, मात्र चित्रपटातील कलाकारांची निवड अद्याप झालेली नाही.

धूम चे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजले. 2004 मध्ये रिलीज झालेल्या 'धूम' द्वारे, संजय गढवी आणि यशराज फिल्म्सने बॉलीवूडला एक अॅक्शन-थ्रिलर प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.

या चित्रपटाच्या सर्व भागांनी बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आहे. पहिल्या भागाबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाच्या पहिल्या भागात अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम, रिम्मी सेन आणि ईशा देओल हे कलाकार मुख्य भूमिकेत होते.

तर दुसऱ्या भागात अभिषेक बच्चन, हृतिक रोशन, ऐश्वर्या राय बच्चन आणि बिपासा बसू यांनी आपली जादू दाखवली.

तसेच या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात आमिर खान, अभिषेक बच्चन आणि कतरिना कैफ दिसले होते.

आता चाहते 'धूम 4' ची आतुरतेने वाट पाहत आहेत. तसंच या चित्रपटात कोणकोणते कलाकार असतील याचीही चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. लवकरच 'धूम 4' प्रेक्षकांच्या भेटीला याणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kishor Kadam : अभिनेता किशोर कदम यांनी उजेडात आणला आणखी एक भयंकर प्रकार, व्यक्त केली 'ही' भीती; मुख्यमंत्री फडणवीसांकडे महत्त्वाची मागणी

Pune Crime: 'आयुष कोमकर खूनप्रकरणी आंदेकर टोळीतील चौघांना अटक'; गुजरातमधील द्वारका येथून घेतले ताब्यात, सोमवारी न्यायालयात हजर करणार

IND A vs AUS A: विराट, रोहित यांची फक्त हवा... ऑस्ट्रेलिया अ विरुद्धच्या ODI मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, रजत पाटीदार कॅप्टन

Latest Marathi News Updates : दिवसभरात देश विदेशात काय घडलं जाणून घ्या एका क्लिकवर

Pune Fraud: 'चांगल्या परताव्याच्या आमिषाने दोघांची ४८ लाखांची फसवणूक'; सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT