nana patekar, cm eknath shinde, eknath shinde news, shivsena news SAKAL
मनोरंजन

Nana Patekar: काहीतरी शिजतंय? नाना पाटेकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट... चर्चांना उधाण

नाना पाटेकर यांनी नुकतीच शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.

Devendra Jadhav

nana patekar meet cm eknath shinde karto news: नाना पाटेकर हे मराठीच नव्हे, हिंदीच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत असलेलं नाव. नाना पाटेकर सध्या सोशल मीडियावर बरेच ऍक्टिव्ह असतात.

इतकंच नव्हे तर नाना पाटेकर यांचे बरेच राजकारण्यांशी चांगले संबंध आहेत. नाना पाटेकर यांनी नुकतीच शिवसेना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीची सध्या सगळीकडे चर्चा आहे.

(Is something cooking? Nana Patekar met the Chief Minister eknath shinde at varsha)

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर नाना पाटेकर यांच्यासोबतचे फोटो शेयर केलेत.

या फोटोखाली लिहिलंय की, ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी आज माझ्या वर्षा या निवासस्थानी येऊन माझी सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचे पुष्पगुच्छ आणि श्री गणरायाची मूर्ती देऊन स्वागत केले.

याशिवाय एकनाथ शिंदे यांनी पुढे खुलासा केला की, या भेटीत राज्य सरकारची सूरु असलेली विविध विकासकामे,

नाम फाउंडेशनचे सध्या सुरू असलेले कार्य, राज्यात सिंचन आणि जलसंधारण कामांची गरज अशा अनेक विषयांवर दिलखुलास चर्चा करण्यात आली. अशी पोस्ट करण्यात आलीये.

नाना पाटेकर यांच्या या भेटीमुळे चर्चांना एकच उधाण आलंय. नाना पाटेकर यांनी फक्त सदिच्छा भेट घेतली असून त्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चांगले संबंध आहेत.

गणपतीच्या काळात याशिवाय नाना पाटेकर यांच्या फार्महाउसवर एकनाथ शिंदे आणि नाना पाटेकर यांनी परस्परांची भेट घेतली.

नाना पाटेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही सदिच्छा भेट कोणते राजकीय रंग समोर आणेल का? या प्रश्नाचे उत्तर नजीकच्या काळात समोर येईलच.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सरकारचं हेच महागाई नियंत्रणाचं सूत्र, शरद पवारांचा गॅस दरवाढीवरून टोला; शेवटी इशाराही दिला

26/11 वेळी 20 गरोदर महिलांचे प्राण वाचवणारी ती परिचारिका कोण ? कंगनाने साकारलीय भूमिका

Photos : 1000 वर्षे जुनी प्राचीन शिलालेखांची कलाकृती सापडली; काळाच्या ओघात दडलेला 7व्या- 8व्या शतकाचा इतिहास, फोटो व्हायरल

Latest Marathi News Live Update : नवनीत राणा यांना राष्ट्रवादी काँग्रेस कडून उमेदवारी नाही

Mumbai: मुंबईत लाइव्ह कॉन्सर्टमध्ये तरुणाचा संशयास्पद मृत्यू, मित्र-मैत्रिणींसोबत मद्यपान केले अन्...; नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT