actress gayatri datar latest photoshoot instagram/ gayatri datar
मनोरंजन

'तुला पाहते रे' फेम गायत्री दातार रिलेशनशिपमध्ये?

गायत्रीचा प्रियकर तिचा हा प्रस्ताव मान्य करणार का?

स्वाती वेमूल

अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला बिग बॉस मराठीचा तिसरा Bigg Boss Marathi 3 सिझन अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला. या शोमध्ये 'तुला पाहते रे' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री गायत्री दातारचाही Gayatri Datar समावेश आहे. गायत्री बिग बॉसच्या घरात आता बऱ्यापैकी रुळली असून तिच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे गायत्री सध्या प्रेमात पडली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल गायत्री नक्की कोणाच्या प्रेमात पडली आहे? तिच्या प्रियकराचं नाव ऐकलंत तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.

गायत्रीचा प्रियकर खुद्द बिग बॉस आहे. सोशल मिडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओच्या माध्यमातून याचा खुलासा झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती तिच्या प्रियकरासोबत प्रेमाच्या गोष्टी करताना दिसत आहे. बिग बॉससमोर ती चक्क लाजतेय, त्यांच्यावर रुसतेय. आता गायत्रीचा प्रियकर तिचा हा प्रस्ताव मान्य करणार का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

गायत्रीने 'तुला पाहते रे' या मालिकेतून अभिनयविश्वात पदार्पण केलं. या मालिकेत तिने मध्यमवर्गीय तरुणीची भूमिका साकारली होती. मालिकेतील तिच्या आणि सुबोध भावेच्या जोडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. गायत्रीला कॉलेजमध्ये असल्यापासून नृत्याचीही आवड आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारी गायत्री तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSMT-Sawantwadi Express : स्वच्छतागृहात सांडपाणी अन् फुटलेल्या काचांवर पुठ्ठे; सावंतवाडी एक्स्प्रेसच्या पहिल्याच प्रवासातील दुरवस्थेचा व्हिडिओ व्हायरल, ट्रेनमधील धक्कादायक वास्तव समोर

Parbhani food Safety Raid: परभणीत अन्न सुरक्षा विभागाचा छापा; पेढीचा परवाना निलंबित, २१५ किलो मिल्क पावडर जप्त

Marathi News Live Updates : राणे कुटुंबीयांच्या जुहूतील घरी गणपती बाप्पाचे उत्साहात आगमन

EPFO Marriage Withdrawal Rule : PF खातेदारांसाठी मोठी बातमी! लग्नासाठी खात्यातून मधून पैसे काढायचे आहेत? जाणून घ्या EPFOचा नवा नियम

MPSC Success Story: शेतकरी कुटुंबातील तरुणाची कमाल! दोनदा अपयश, ०.२५ गुणांनीही हुकली परीक्षा; तरी जिद्द सोडली नाही, इरफान शेखने मिळवली सलग दुसरी सरकारी नोकरी

SCROLL FOR NEXT