Ishaan Khatter Instagram/ google
मनोरंजन

अनन्याच्या घरी बुके घेऊन गेला ईशान खट्टर; व्हिडिओ व्हायरल

'कृपया माझं नाव घेऊ नको' ईशानने केली विनंती.

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे(Ananya Panday) गेल्या काही दिवसांपासून आर्यन खान ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत आहे. गेल्या तीन दिवसांपासून अनन्याची ईडीकडून चौकशी सुरु आहे. या सगळ्यात अनन्याचा मित्र ईशान खट्टर(Ishaan Khatter) तिला भेटायला आल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी ईशानला ट्रोल करत आहेत.

हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरेंद्र चावलाने शेअर केला आहे. या व्हिडीओत ईशान एका फुलांच्या स्टॉलवर फुलांचा गुच्छ घेताना दिसत आहे. त्यानंतर त्याची कार अनन्याच्या इमारतीबाहेर दिसली.हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी 'हेच खरं प्रेम'असं म्हटलं आहे. तर काहींनी त्यांना ट्रोल केले आहे. एक नेटकरी म्हणाला, “फुलं देऊन हेच म्हणाला असेल की कृपया माझं नाव घेऊ नको.” दुसरा नेटकरी म्हणाला, “माझं नाव घेतलं नाही ना..,” अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी इशानला ट्रोल केलं आहे.अनन्या आणि ईशानने 'खाली पिली' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. ते दोघे बऱ्याचवेळा एकत्र दिसल्यामुळे, ते दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा सुरु आहेत. मात्र, यावर त्यादोघांनी चांगले मित्र असल्याचे म्हटले आहे. लवकरच इशान 'फोन बूथ' या चित्रपटात दिसणार आहे.

गेले काही दिवस ड्रग्ज प्रकरणाच्या संदर्भात आर्यनची नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने चौकशी केली. शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला याच प्रकरणात ३ ऑक्टोबर रोजी अटक करण्यात आलं होतं.एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,"आर्यन खानच्या मोबाईल फोनवरून मिळालेल्या चॅट्सवरून असे दिसून येते की २०१८-२०१९ मध्ये तिने आर्यनला ड्रग्स विक्रेत्यांचे नंबर देऊन तीन वेळा ड्रग्स पुरवण्यास मदत केली."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT