Ishita Dutta and Vatsal Sheth welcome baby boy drushyam 2 fame actress SAKAL
मनोरंजन

Ishita Dutta: दृश्यम फेम अभिनेत्री इशिता दत्ता झाली आई, सर्वांकडून अभिनंदनाचा वर्षाव

Ishita Datta Baby: इशिता दत्ता आणि वत्सल शेठ हे टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत.

Devendra Jadhav

Ishita Dutta News: इशिता दत्ता आणि वत्सल शेठ हे टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांना अनेकदा एकत्र पाहिले जाते आणि ते खूप क्यूट देखील आहेत. हे दोघेही आता आई - बाबा झाले आहेत. वत्सल सेठ आणि इशिता दत्ताने 19 जुलै रोजी त्यांच्या मुलाचे स्वागत केले. 'इटाईम'च्या वृत्तानुसार, आई आणि मूल दोघेही बरे असून अभिनेत्रीला शुक्रवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

(Ishita Dutta and Vatsal Sheth welcome baby boy drushyam 2 fame actress)

ETimes ने बातमी दिली की अभिनेत्री इशिता दत्ताने बुधवारी तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. रिपोर्टनुसार, 'मुल आणि आई निरोगी आहेत. शुक्रवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. सध्या दोघांचे कुटूंब सध्या सर्वात आनंदी आहे.

इशिता दत्ता नेहमीच तिच्या फॅन्स आणि फॉलोअर्सना तिच्या कौटुंबिक जीवनाबद्दल आणि तिच्या स्वभावाबद्दल अपडेट करते. तिने तिचे बेबी बंप आणि पती वत्सल दाखवणारे अनेक सेल्फी गरोदरपणात शेअर केले आहेत.

28 नोव्हेंबर 2017 रोजी 'बेपनाह प्यार' फेम अभिनेत्री इशिता दत्ताने तिचा 'बाजीगर' फेम अभिनेता वत्सल शेठसोबत लग्नगाठ बांधली.

या वर्षी 31 मार्च रोजी, या जोडप्याने घोषित केले की ते त्यांच्या पहिल्या बाळाचे स्वागत करण्यास तयार आहेत.

तिने कलर-ऑर्डिनेटेड पोशाख घातलेला फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये वत्सल इशिताच्या बेबी बंपकडे टक लावून पाहत आहे.

काही दिवसांपूर्वी इशिता दत्ताच्या आईने अभिनेत्रीसाठी बेबी शॉवरचे आयोजन केले होते. इशिताने तिच्या बंगाली बेबी शॉवरचा एक व्हिडिओ शेअर केला ज्याला सोशल मीडियावर खूप पसंती मिळाली.

इशिताने फंक्शनसाठी गुलाबी रंगाची बनारसी साडी नेसली होती आणि ती खूपच सुंदर दिसत होती. व्हिडिओ शेअर करताना अभिनेत्रीने लिहिले, 'गोदभराई फंक्शन.

या काही क्षणांसाठी, हार्दिक शुभेच्छा आणि आशीर्वादांसाठी सर्वांचे आभार. एकुणच आई झाल्याने इशिता दत्ता आणि वत्सल शेठ दोघेही खुप खुश आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Kolhapur Crime : शेतात कामासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग, शरीरसुखास नकार दिल्याने निर्घृण खून; खिशावरील 'त्या' डागाने उलगडलं धक्कादायक रहस्य

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

SCROLL FOR NEXT