Israel Palestine Conflict Nusrat Bharucha Mother reaction  esakal
मनोरंजन

Nusrat Bharucha Mother Reaction : 'ती सगळ्यात पहिल्यांदा....'! अभिनेत्री नुसरतच्या आईनं दिली मोठी प्रतिक्रिया

मात्र यासगळ्यात एका बातमीनं बॉलीवूडच्या चाहत्यांना धक्का बसल्याचे दिसून आले.

युगंधर ताजणे

Israel Palestine Conflict Nusrat Bharucha Mother reaction : जगभरात त्या घटनेनं खळबळ उडाली आहे. ज्या गुप्तहेर संघटनेचा साऱ्या जगभरात दरारा आहे. त्या मोसादलाही आपल्याच देशात काय होणार आहे याविषयी काहीही माहिती नव्हते. हमास नावाच्या दहशतवादी संघटनेनं इस्त्राईलवर रॉकेटचा मारा केला आणि परिसरातील अनेक शहरं बेचिराख करुन टाकल्याचे दिसून आले आहे.

अमेरिकेपासून भारतापर्यत अनेक देशांनी इस्त्राईलला आपला पाठींबा दर्शवला आहे. मात्र यासगळ्यात एका बातमीनं बॉलीवूडच्या चाहत्यांना धक्का बसल्याचे दिसून आले. ती गोष्ट म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री नुसरत भरुचा ही इस्त्राईलमध्ये अडकून पडल्याची. ही बातमी समोर येताच वेगानं सुत्रं फिरली आणि अभिनेत्रीशी संपर्क साधण्यात आला. इस्त्राईलमधील भारतीय दुतावासानं अभिनेत्रीची मदत केली आहे.

या प्रकरणावर आता अभिनेत्रीच्या आईनं टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्रतिक्रिया दिली आहे. जी चर्चेत आली आहे. सध्या तरी अभिनेत्रीशी कोणताही संपर्क होत नसून ती सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले आहे. ती भारतात येताच आम्ही आपल्याला नक्की सांगू असेही त्यांनी म्हटले आहे. आमच्याकडे जी माहिती आली आहे त्यानुसार नुसरत ही तेल अवीव इथून येणार आहे. ती पहिल्यांदा दुबईला जाईल आणि मग मुंबईमध्ये येणार आहे.

आता इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामीन नेतान्याहू यांनी थेट युद्धाची घोषणा केली आहे. गाझा पट्टीतील ‘हमास’ या दहशतवादी गटानं जो हल्ला केला त्यात शंभराहून अधिक जण ठार झाले आहेत. यात इस्त्राईलनं देखील हमासला जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, नुसरतच्या टीममधील संचिता त्रिवेदी यांनी म्हटले आहे की, नुसरतशी संपर्क झाला असून ती काही वेळानंतर भारतात येणार आहे.

अभिनेत्री नुसरत भरुचाचा अकेली हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये एक मुलगी काही कारणाने इराक यादवी युद्धात अडकते. हा चित्रपट युद्धाच्या वातावरणात अडकलेल्या मुलीच्या घरी परतण्याच्या संघर्षावर आधारित आहे. अनेक अडथळ्यांनंतरही ती जगण्यासाठी धडपडत असल्याचे या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. नुसरत सध्या इस्त्राइल मध्ये अडकल्याने अशीच घटना सध्या तिच्या आयुष्यात घडत असल्याचं बोललं जातंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Chairman : माळेगाव कारखाना चेअरमनपदी अखेर अजितदादाचं! , विरोधकांच्या आक्षेपावर निवडणूक अधिकारी म्हणाले, आता...

ENGU19 vs INDU19 : १३ चौकार, १० षटकार! वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक; फक्त २३ चेंडूंत चोपल्या ११२ धावा, निघाली इंग्लंडची हवा

Mumbai News: मुंबईत पावसामुळे रस्त्यांची दैना, खड्ड्यांची आकडेवारी समोर, पण पालिकेचा वेगळाच दावा

Cyber Fraud : जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार: 'सीबीआय'च्या नावाने निवृत्त डॉक्टरला ३१ लाखांना गंडवले

Top 5 Government Schemes: सरकारच्या तिजोरीतून तुमच्यासाठी खास! ‘पीएम किसान’सारख्या 'या' 5 योजना ठरतील तुमचं आर्थिक कवच

SCROLL FOR NEXT