Actress kangana and irfan pathan Team esakal
मनोरंजन

इरफान पठाण - कंगणाची जुंपली, जाणून घ्या कारण

इस्त्राईल आणि पॅलेस्टाईनमधील वाद (israel palestine war) टोकाला गेला आहे.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडची प्रसिध्द अभिनेत्री कंगणा (kangana ranaut )राणावत काही केल्या शांत बसायला तयार नाही. तिची वायफळ बडबड सुरु आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिच्या बेताल प्रतिक्रियामुळेच तिला व्टिटरनं तिला दणका दिला होता. तिचे अकाऊंट सस्पेंड करण्यात आले होते. मात्र त्यानंतरही तिनं त्यापासून कुठला धडा घेतला नाही. कंगणा आता वेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी संवाद साधत आहे. सध्या इस्त्राइलचा (israel palestine war) मुद्दा पेटला आहे. त्यावर तिनं आपली भूमिका मांडली खरी पण प्रसिध्द भारतीय वेगवान गोलंदाज इरफान पठाण आणि तिच्यात वादावादी झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून इस्त्राईल आणि पॅलेस्टाईनमधील वाद (israel palestine war) टोकाला गेला आहे. त्याचे रुपांतर हिंसेत झाले आहे. त्यात सर्वसामान्य नागरिक, लहान मुले यांना आपला जीव गमवावा लागत असल्याचे दिसून आले आहे. यासगळ्या परिस्थितीवर बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटींनी आपले मत व्यक्त केले आहे. त्यात कंगणाचाही समावेश आहे. त्याचे झाले असे की, इरफान पठाणनं (cricketer irfan pathan ) पॅलेस्टाईनचे समर्थन केले आहे. त्यानं लिहिलं आहे की, जर तुमच्यात थोड्याफार प्रमाणात माणुसकी शिल्लक असेल तर तुम्ही पॅलेस्टाईनच्या विरोधात काहीही लिहिणार नाही. त्यानं दुस-या व्टिटमध्ये लिहिले आहे की, मानवतेचा प्रचार करणारा एकच देश आहे त्याचे नाव जग असे आहे.

actress kangana post

इरफानची भूमिका कंगणाला (kangana ranaut )आवडलेली नाही. तिनं यावेळी पश्चिम बंगालमधील हिंसेचा उल्लेख केला आहे. कंगणानं इंस्टावरुन एक पोस्ट शेअर केली आहे त्यात तिनं लिहिलं आहे की, जर इरफानला दुस-या देशांची एवढी पर्वा आहे तर मग त्यानं आपल्या देशातील पश्चिम बंगालमध्ये जे काही चाललं आहे त्याविषयी तो काहीच का बोलला नाही. असा प्रश्न कंगणानं त्याला विचारला आहे.

यासगळ्या मुद्द्यावर इरफाननं देखील कंगणाला उत्तर दिलं आहे. देशात व्देष पसविल्याबद्दल कंगणाचे व्टिटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहे. आता ती दुस-या माध्य़मातूनही पसरवताना दिसत आहे. मी जे काही बोललो आहे ते सर्व मानवतेच्या दृष्टीनं लिहिलं आहे. मात्र मला कंगणासारखी माणसं जेव्हा भेटतात तेव्हा मी त्यापासून लांब राहतो. असेही इरफाननं सांगितलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad Boat Accident : समुद्रात बोट बुडाली! बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, थरारक व्हिडीओ व्हायरल, अनेकजण बुडाले

Maharashtra Latest News Update: हिंजवडी परिसरातील आयटी कंपनीतील 82 कोटी रुपयांच्या डेटाची चोरी

Beed : सरकारी वकिलानं कोर्टातच संपवलं आयुष्य, सत्काराच्या शालने घेतला गळफास; बीडमध्ये खळबळ

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

SCROLL FOR NEXT