Takeshi's Castle Jaaved Jaaferi 
मनोरंजन

जावेद जाफरी Takeshi's Castle साठी पुन्हा येणार? लोकप्रिय TV Show ची पर्वणी

सकाळ डिजिटल टीम

लोकप्रिय टी.व्ही. शो 'टकेशीज् कॅसल'च्या नव्या पर्वाची घोषणा झाली. 'टकेशीज् कॅसल रीबूट' नावाने यंदा नवा सिजन सुरू होणार आहे. मात्र, घोषणा झाल्यानंतर या कार्यक्रमासाठी हिंदीतून कॉमेंट्री कोण करणार याकडे चाहत्यांचं लक्ष्य लागलं होतं. अखेर अभिनेता आणि कॉमेडियन जावेद जाफेरीने यासंदर्भात एक ट्वीट केलं. (Jaaved Jaaferi to return as commentator for Takeshi's Castle reboot)

कारण मूळ जपानी भाषेत असणारा हा कार्यक्रम भारतात लोकप्रिय होण्यामध्ये जावेद जाफरीच्या समालोचनाचा मोठा वाटा होता. हिंदी समालोचक म्हणून परत आल्याचं जावेदने सांगितलं आणि चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. अमेझॉन प्राइम व्हिडीओवर टकेशी किटानो यांनी हा कार्यक्रम होस्ट केला होता. जपानी गेम शो 'टकेशीज् कॅसल' परत येत आहे हे कळल्यावर नव्वदच्या दशकातील मुलांच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत.

शोच्या साहसी आणि अनोख्या कल्पनेव्यतिरिक्त, 'टकेशीज् कॅसल' बद्दलचा सर्वात लक्षात राहणारा भाग म्हणजे जावेद जाफरी यांनी केलेली विनोदी काँमेंट्री. भारतात या टीव्ही शोचं वेड तरुणांमध्ये लागल्याचं महत्वाचं कारण जावेद यांचं समालोचन आहे. आता नव्याने येणाऱ्या रीबूटसाठी हिंदीमध्ये काँमेंट्री कोण करणार असा प्रश्न चाहत्यांनी विचारला होता. अनेकांना याबद्दल शंका वाटत होती. मात्र, कॉमेडियन जावेदने त्याच्या संभाव्य पुनरागमनाचे संकेत देणारं ट्वीट शेअर केलंय.

टकेशीज् कॅसल रीबूटची घोषणा झाल्यानंतर यावर चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या. अमेझॉन व्हिडीओने याचे राईट्स घेतले आहेत. यासंदर्भात ट्वीट केल्यानंतर 'सर्वोत्तम भाग म्हणजे जावेद जाफरी यांनी केलेली हिंदी कॉमेंट्री होती' असा उल्लेख करण्यात आला. यावर जाफरी यांनी "हम्म!!! क्या ख्याल है?" असं ट्वीट केलं. यापुढे त्यांनी #TakeshisCastle #OnceMore हे हॅशटॅग देखील वापरले. त्यामुळे चाहत्यांना पुन्हा जावेद यांची कॉमेंट्री ऐकायला मिळणार असल्याचं स्पष्ट झालं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाखो लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी अपडेट, 'या' लाभार्थी महिलांचे १५०० रुपये कामयचे बंद, 'ही' चूक नडली

T20 World Cup: मुंबईत नेपाळी प्रेक्षकांचा पुन्हा झाला हिरमोड; वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात वेस्ट इंडीजचा एकतर्फी विजय

सर्वांची लाडकी शेवंता अडकली लग्नबंधनात, अपूर्वा नेमळेकरने व्हॅलेटाईन डे दिवशी बांधली लग्नगाठ, नवरा आहे तरी कोण?

Chandrapur Accident: भाविकांचे वाहन उलटले, एक ठार, सतरा जखमी; भटाळा येथे गेले होते दर्शनासाठी

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT