jackie shroff 
मनोरंजन

'..तेव्हा पत्नीने मला गुंडांपासून वाचवलं'; जॅकी श्रॉफने सांगितला किस्सा

१९८७ साली या दोघांनी लग्नगाठ बांधली.

स्वाती वेमूल

'डान्स दिवाने ३' Dance Deewane 3 या रिअॅलिटी शोच्या सेटवर अभिनेता जॅकी श्रॉफने Jackie Shroff पत्नी आयशा श्रॉफसोबतचा Ayesha Shroff एक किस्सा प्रेक्षकांना सांगितला. जॅकी श्रॉफ आणि त्यांच्या मित्राला पत्नीने गुंडांपासून वाचवल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तुम्ही पत्नीला घाबरता का, असा प्रश्न सूत्रसंचालक राघव जुयालने विचारला. त्यावर जॅकी आणि सुनील शेट्टीने होकारार्थी उत्तर दिलं. जॅकी श्रॉफने आयशा श्रॉफशी तर सुनील शेट्टीने माना शेट्टीशी लग्न केलं. (Jackie Shroff says Ayesha Shroff saved him when a gang came to thrash him)

"माझं फक्त नावच दादा आहे भिडू. मी माझ्या पत्नीला खूप आधीपासूनच घाबरतो. नेपेन्सी रोडवर मी तिला भांडण करताना पाहिलंय. मी आणि माझ्या मित्राचा एकाशी वाद झाला आणि आम्हाला मारण्यासाठी मोठी गँगच आली होती. तेव्हा मी माझ्या पत्नीला पहिल्यांदा भांडताना पाहिलं. तेव्हापासून मी तिला घाबरतो", असं जॅकी श्रॉफ म्हणाले.

जॅकी श्रॉफ यांना पहिल्यांदा भेटली तेव्हा आयशा १३ वर्षांची होती. १९८७ साली या दोघांनी लग्नगाठ बांधली. त्यांना टायगर आणि कृष्णा ही दोन मुलं आहेत. जॅकी श्रॉफ हे नुकतेच 'राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई' या चित्रपटात झळकले होते. यामध्ये सलमान खान, दिशा पटानी आणि रणदीप हुडा यांच्यासोबत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. अक्षय कुमारच्या आगामी 'सूर्यवंशी' या चित्रपटातही ते काम करणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Record! विराट कोहलीने IPL इतिहासात कोणालाच न जमलेला विक्रम केला, पहिला फलंदाज ठरला; रोहित खूपच लांब राहिला

Commercial Gas Cylinder Issue : व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळितच; खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांमध्ये १० हजारांपेक्षा अधिक ग्राहक

IPL 2026 Point Table: दक्षिणेचा 'दिल्लीवर' कब्जा! RCB चा मोठा विजय, दोन दिवसांपूर्वी २६४ धावा करणारा DC आज ७५ धावांत तंबूत

IPL 2026 मध्ये मोठा धक्का! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर मोठं कांड उघड; RCB vs GT सामन्यात गोंधळ, दोघांना अटक, काय घडलं?

DC vs RCB Live: दिल्ली कॅपिटल्सचे वस्त्रहरण! पण, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला 'नकोसा' डाग मिटवता नाही आला; भुवी, जोश यांचा कहर...

SCROLL FOR NEXT