Jackky Rakul latest news esakal
मनोरंजन

Jackky Rakul Net Worth : पडद्यावर भलेही झाले असतील 'फ्लॉप' पण खिशात आहे 'एवढ्या' कोटींची रक्कम?

जॅकी भगनानी आणि रकूल प्रीतची एकुण संपती (Jackky Rakul Net Worth) किती याविषयी चाहत्यांना कमालीची उत्सुकता आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Jackky Rakul Net Worth - बॉलीवूडमधील प्रसिद्ध कपल जॅकी भगनानी अन् रकूल प्रीत सिंग यांचा शाहीविवाह सोहळा पार पडतो आहे. गेल्या काही दिवसांपासून या विवाहसोहळ्याची जोरदार चर्चा होती. अखेर गोव्यातील एका अलिशान हॉटेलमध्ये हा शुभविवाह सोहळा पार पडणार आहे. त्याला बॉलीवूडमधील वेगवेगळे सेलिब्रेटी हजर राहणार आहेत.

या सगळ्यात सोशल मीडियावर जॅकी भगनानी आणि रकूल प्रीत सिंग यांच्या नेट वर्थचा गुगलवरुन शोध घेतला जात आहे. जॅकी आणि रकूलची एकुण प्रॉपर्टी किती याविषयी चाहत्यांना कुतूहल आहे. बॉलीवूडचे प्रसिद्ध निर्माते वासू भगनानी यांचा मुलगा जॅकी भगनानी (Vashu Bhagnani) हा अभिनेता आणि निर्माता म्हणून लोकप्रिय आहे. त्यानं २००९ मध्ये कल किसने देखा मधून डेब्यू केलं होतं.

जॅकीचा पहिला चित्रपट हा फ्लॉप झाला होता. त्याला प्रेक्षकांना नाकारले होते. यानंतर काही व्हिडिओ साँगमध्ये तो चमकला. त्यावरुन त्याला काही अंशी लोकप्रियताही मिळाली होती. मात्र बॉलीवूडमध्ये एक अभिनेता म्हणून त्याला खूप संघर्ष करावा लागल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यानं एक निर्माता म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यात त्याला बऱ्यापैकी यश मिळाले.

रकूल आणि जॅकीचं लग्न गोव्यातील एका प्रसिद्ध रिसोर्टमध्ये होत आहे. रकूल आणि जॅकीचं प्री वेडिंग हे सोशल मीडियावर लोकप्रिय होताना दिसत आहे. त्या सोहळ्याला बॉलीवूडमधील वेगवेगळे सेलिब्रेटी हजर होते. अजूनपर्यत रकूल अन् जॅकीच्या लग्नसोहळ्यातील कोणतेही फोटो समोर आले नसून पाहुणे मंडळींना लग्नस्थळी मोबाईल नेण्यास बंदी आहे.

जॅकी हा वासू भगनानी यांचा मुलगा असून वासू भगनानी यांनी गोविंदा च्या कुली नंबर १ पासून निर्माता म्हणून सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या चित्रपटांची निर्मिती केल्याचे दिसून आले. मुलासाठी ज्या पहिल्या चित्रपटाची निर्मिती केली होती तो चित्रपट फ्लॉप झाला होता. त्यानंतर पुन्हा २०१८ मध्ये मित्रों नावाच्या फिल्ममध्ये जॅकी दिसला होता.

तो चित्रपटही फ्लॉप झाला होता. हिरो म्हणून जॅकी फारसा लोकप्रिय झाला नाही. त्याला तितका प्रेक्षकवर्गही मिळाला नाही. तो सोशल मीडियावर विशेष लोकप्रिय आहे. जॅकी हा यशस्वी निर्माता आहे. त्याची नेटवर्थ ३५ कोटी रुपयांची आहे. तर रकूलची प्रॉपर्टी ही ४९ कोटींची असल्याची सुत्रांची माहिती आहे. जॅकीनं आतापर्यत ९ चित्रपटांमध्ये हिरो म्हणून काम केले आहे. मात्र ते सगळे चित्रपट फ्लॉप झाले आहेत. जॅकीनं बालकलाकार म्हणून रहना है तेरे दिल में नावाच्या चित्रपटात काम केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vice President Election : NDA चा ‘राजकीय डाव’! उपराष्ट्रपतीपदासाठी सी. पी. राधाकृष्णन यांना उमेदवारी, सध्या आहेत महाराष्ट्राचे राज्यपाल

Pune Accident: दुर्दैवी घटना! 'ट्रक व टॅंकरच्या अपघातात एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू'; वर्षश्राद्धासाठी जाताना काळाचा घाला..

Asia Cup 2025: केएल राहुलची भारताच्या टी२० संघात का निवड होऊ शकत नाही? कारण आले समोर

Latest Marathi News Updates : भींत कोसळून तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Crime: महाराष्ट्र हादरला! एकामागून एक ४ मुलांना विहिरीत फेकलं, वडिलांचं धक्कादायक कृत्य, संतापजनक कारण समोर

SCROLL FOR NEXT