Jackky Bhagnani-Rakul Preet Singh Wedding esakal
मनोरंजन

Jackky-Rakul Preet Wedding : ना पत्रिका छापणार, ना फटाके फोडणार जॅकी अन् रकूलचं होणार 'इको फ्रेंडली' लग्न!

रकुल अन् जॅकीच्या इको फ्रेंडली (Jackky-Rakul Preet Wedding ) लग्नाची जोरदार तयारी सुरु झाली आहे.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Jackky Bhagnani-Rakul Preet Singh Wedding: मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी जॅकी भगनानी आणि रकुल प्रीत सिंगच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. सुरुवातीच्या काळात भारताबाहेर जाऊन लग्न करण्याचे प्लॅनिंग असणाऱ्या जॅकी अन् रकुलनं शेवटी भारतातील गोवा राज्यात लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे.

जॅकी अन् रकुलच्या चाहत्यांना त्यांच्या लग्नाचे वेध लागले आहे. गेल्या (Jackky Rakul Latest News) काही वर्षांपासून रकुलनं तिच्या चित्रपटांतून प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यामुळे तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत राहिला आहे. येत्या २१ फेब्रुवारी मध्ये हे सेलिब्रेटी गोवा येथे विवाहबद्ध होणार आहेत. ये लग्न तीन दिवस सुरु राहणार आहे. जॅकी अन् रकुलचं लग्न खास पद्धतीनं होणार असल्याची चर्चा आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जॅकी आणि रकुल हे इको फ्रेंडली पद्धतीनं करणार आहे, त्यांनी त्यांच्या लग्नाचे कार्डही छापलेले नाहीत. एनएनआयच्या एका रिपोर्टनुसार, जॅकीनं मोठ्या प्रमाणात लग्नाची तयारी सुरु केी आहे. पेपर वाया जाऊ नये म्हणून त्यांनी डिजिटल कार्ड छापले आहेत. तसेच या लग्नामध्ये कोणत्याही प्रकारचे फटाके फोडले जाणार नाहीत, असेही बोलले जात आहे.

रकुल अन् जॅकी हे इको फ्रेंडली पद्धतीनं लग्न करणार आहे. लग्न झाल्यानंतर हे कपल एक झाड देखील लावणार आहे. त्यांनी एक कार्बन फुटप्रिंट स्पेशालिस्टला लग्नासाठी निमंत्रित केले आहे. त्यातून ते त्या लग्नाला एनव्हायरमेंट फ्रेंडली करण्यावर भर देणार आहे. सध्या सोशल मीडियावर जॅकी अन् रकुलच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे.त्यावरुन वेगवेगळ्या चर्चांना उधाणही आले आहे.

प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्राकडून लग्नासाठी खास ड्रेस तयार करुन घेतला जाणार आहे. त्याचीही चाहत्यांना उत्सुकता आहे. ऑक्टोबर २०२१ मध्ये रकुल अन् जॅकीनं त्यांच्या नात्याविषयी खुलासा केला होता. त्यांच्या व्हायरल झालेल्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळाली होती. रकुलच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचे झाल्यास ती लवकरच इंडियन २ मध्ये दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT