Jacqueline Fernandez New House:  Esakal
मनोरंजन

Jacqueline Fernandez New House: मनी लाँड्रिंग प्रकरणात चर्चेत आलेल्या जॅकलीननं घेतलं नवीन घर, किंमत ऐकून बसेल धक्का

Vaishali Patil

Jacqueline Fernandez New House: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस ही तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेच चर्चेत असते. तिचे नाव गँगस्टर सुकेशसोबत अनेकदा जोडले गेले आहे. सुकेशने तुरुंगातून तिला पत्र पाठवत असतो. मात्र जॅकलिने यावर मौन पाळले आहे. ती केवळ तिच्या करियरवर फोकस करत असल्याच दिसत आहे. जॅकलीनने तिच्या आगामी 'फतेह' चित्रपटामुळेही चर्चेत आहे.

त्यातच आता जॅकलीन फर्नांडिसने मुंबईत घर खरेदी केल्याची बातमी समर आली आहे. तिने मुंबईतील वांद्रे पश्चिम येथे नवीन आलिशान घर खरेदी केले आहे. मुंबईतील वांद्रे येथे स्थित पाली हिल हा एक पॉश एरिया आहे. या ठिकाणी अनेक बॉलिवूड स्टार्सची घरे देखील आहेत.

मिळालेल्या बातमीनुसार, जॅकलिनचे हे नवीन घर पाली हिलच्या नवरोज इमारतीत आहे. या इमारतीतील सर्व घरे ही 1119 स्क्वेअर फूट 2557 स्क्वेअर फूट कार्पेट एरियामध्ये बांधलेली आहेत. सर्व अपार्टमेंट 3 BHK आणि 4 BHK चे आहेत. ज्याची किंमत 12 कोटी रुपयांपासून सुरू होते. या घरातच क्लब हाऊस, स्विमिंग पूल आणि जिमची सोय देखील आहे.

टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, जॅकलिनचे नवे या कलाकारांच्या घराशेजारी असणार आहे. ती लवकरच रणबीर कपूर, आलिया भट्ट, करीना कपूर, सैफ अली खान यासारख्या कलाकारांची शेजारीन होणार आहे.

जॅकलिनच्या या घराजवळ सलमान खानचे अपार्टमेंटही देखील आहे. त्याचबरोबर शाहरुखचे घर देखील काही अतंरावरच आहे. त्यातच आता दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग देखील या शिफ्ट होणार आहे. त्याच्या घराचे काम सुरु आहे.

काही महिन्यांपूर्वी, जॅकलीन ठग सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत होती. या प्रकरणी ईडीने तिची चौकशी केली होती आणि तिच्या 7.27 कोटी रुपयांची मालमत्ताही जप्त केली होती. आता त्यातच जॅकलिने नवीन घर खरेदी केल्याने चर्चांना उधाण आलं आहे.

जॅकलिनच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच वैभव मिश्राच्या फतेह चित्रपटात दिसणार आहे, ज्यामध्ये ती सोनू सूद आणि विजय राज यांच्यासोबत दिसणार आहे.

याशिवाय ती आदित्य दत्तच्या क्रैक - जीतेगा तो जिएगा या अॅक्शन स्पोर्ट्स चित्रपटातही दिसणार आहे. या चित्रपटात ती विद्युत जामवाल आणि अर्जुन रामपालसोबत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Pump Business: पेट्रोल पंप मालकाला नेमका किती नफा होतो? पाहा दिवसाचं आणि महिन्याचं संपूर्ण गणित

Koyna Dam Water Storage Update : कोयना धरण 100 टीएमसी पार! तरीही नदीत विसर्ग का नाही? धरण व्यवस्थापनाचा मोठा निर्णय, महाबळेश्वरची स्थिती काय?

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

Marathi News Live Updates : विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी अमित ठाकरे आज नागपूर दौऱ्यावर

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

SCROLL FOR NEXT