jacqueline fernandez 
मनोरंजन

'गेंदा फुल' गाण्यावर जॅकलीनने साडी नेसून केलेला हा हटके डान्स पाहिलात का?

सकाळवृत्तसेवा

मुंबई- बॉलीवूडची मस्तीखोर अभिनेत्री म्हणून जॅकलीन फर्नांडिस ओळखली जाते. जॅकलीनने तिच्या अभिनयाने आणि तिच्या डान्सने चाहत्यांमध्ये क्रेझ निर्माण केली आहे. सिनेमा असो किंवा मग पुरस्कारसोहळे, ऑनस्क्रीन असो वा ऑफस्क्रीन जॅकलीच्या डान्सचे जलवे काही औरंच..जॅकलीन अनेकदा तिचे फनी व्हिडिओ देखील शेअर करत असते. जॅकलीनच्या पोस्टमध्ये ग्लॅमरस फोटो पासून ते वर्कआऊट व्हिडिओपर्यंत सगळ्याची तिच्या चाहत्यांमध्ये चर्चा रंगताना दिसते. असाच एक जॅकलीनचा डान्स व्हिडिओ व्हायरल होतोय आणि तिच्या चाहत्यांना देखील तो भलताच आवडलाय.

जॅकलीन सध्या लॉकडाऊनमुळे सलमानच्या फार्महाऊसवर पनवेल येथे अडकली असून तिथे ती निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवत आहे. तिथे असताना देखील तिने सलमान सोबतचा एक क्रेझी डान्स व्हिडिओ व्हायरल केला होता. आता जॅकलीनचा असाच एक टाईमपास व्हिडिओ व्हायरल होतोय. या व्हिडिओमध्ये ती रॅपर बादशाहच्या प्रसिद्ध गेंदा फुल या गाण्यावर डान्स करताना दिसतेय. सध्या गेंदा फूलवर अनेक सेलिब्रिटी आणि चाहते त्यांच्या वेगवेगळ्या डान्स मुव्हज करुन व्हिडिओ करत असतात. टिकटॉकवर तर हे गाणं जास्त लोकप्रिय आहे. या व्हिडिओमध्ये जॅकलीन मजा मस्ती करत तिच्या स्टाईलने हटके डान्स करताना दिसतेय. यात तिने साडी नेसली असून ब्लाऊजचा हटके जुगाड केल्याचं दिसुन येतंय. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये याविषयी खास टिप्पणी करण्यात आसी आहे.

जॅकलीनचा हा डान्स तिच्या चाहत्यांमध्ये चांगसाच हिट ठरतोय. हा व्हिडिओ आत्तापर्यंत साडेचार लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला आहे. काही दिवसांपू्र्वीच सलमान आणि जॅकलीनने फार्महाऊसवर केलेलं तेरे बिना गाणं हिट ठरलं होतं. लॉकडाऊनमध्ये या गाण्याने चांगला रेकॉर्ड ब्रेक केला आहे. या गाण्यात जॅकलीन आणि सलमानचा जबरदस्त रोमान्स पाहायला मिळाला होता. 

jacqueline fernandez dance on badshah song genda phool  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirmala Sitharaman : काँग्रेसने देश विकून शेतकऱ्यांना फसविले; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आरोप

Latur Airport: लातूर विमानतळ ‘धावपट्टीचे ऑडिट करा’; पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजेंनी विमानतळ विकास कंपनीला फटकारले!

Vishwa Marathi Sammelan : अखेर मुहूर्त ठरला! कुसुमाग्रजांच्या स्मृती दिनी नाशिकमध्ये भरणार 'विश्व मराठी संमेलन'

Latest Marathi News Live Update : श्वान चिकित्सकांच्या अधिवेशनाला मोहन भागवत उद्घाटक म्हणून उपस्थित राहणार

Hug Day in Valentine Week : सांग तिला, तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा...; नात्यांना सावरण्यासाठी कधीकधी स्पर्शाची उब हवी असते!

SCROLL FOR NEXT