Jacqueline Fernandez Latest News
Jacqueline Fernandez Latest News Jacqueline Fernandez Latest News
मनोरंजन

Jacqueline Fernandez : जॅकलीनच्या स्टायलिस्टची EOW समोर कबुली; म्हणाली...

सकाळ डिजिटल टीम

Jacqueline Fernandez Latest News सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी EOWने फॅशन डिझायनर लिपाक्षी इलावाडीची तब्बल ७ तास चौकशी केली. EOW ने लिपाक्षीकडून बँक तपशील घेतले. सुकेशने लिपाक्षीच्या खात्यात ३ कोटी वळते केले होते. ‘जॅकलीन फर्नांडिसला आवडीचे डिझायनर कपडे देण्यासाठी तसेच जॅकलीनच्या (Jacqueline Fernandez) आवडी निवडीची माहिती घेण्यासाठी सुकेशने हे पैसे बॅंक खात्यात वळते केले होते’ असे चौकशीत लिपाक्षीने सांगितले.

‘सुकेशच्या फसवणुकीच्या पैशांबद्दल काहीच माहिती नाही’, असे लिपाक्षीने ईओडब्ल्यूला सांगितले. गरज पडल्यास पुन्हा लिपाक्षीलाही बोलावले जाऊ शकते. सुकेश चंद्रशेखर यांच्या २०० कोटींच्या फसवणूक प्रकरणातील अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसचा त्रास सध्या कमी होताना दिसत नाही आहे. या प्रकरणी आतापर्यंत चौकशीच्या अनेक फेऱ्या झाल्या आहेत.

लिपाक्षी ११.३० वाजता कार्यालयात आली आणि तिची ८ तास चौकशी करण्यात आली. यानंतर ती तेथून सायंकाळी ७.३० वाजता निघून गेली. जॅकलीन आणि सुकेशच्या नात्याबद्दल लिपाक्षीकडून जाणून घ्यायचे असल्याचे पोलिसाने सांगितले. लिपाक्षी १० वर्षांपासून अनेक सेलिब्रिटींसोबत काम करीत आहे. लिपाक्षीला आधी बोलावले होते. पण ती आली नाही. नंतर तिची एकांतात चौकशी करण्यात आली.

ताबडतोब तोडला संपर्क

अधिकाऱ्याने पुढे खुलासा केला की, लिपक्षीने हे सांगितले की सुकेशने तिला जॅकलीनसाठी तिच्या आवडीचे कपडे घेण्यासाठी ३ कोटी रुपये दिले होते. त्या पैशातून लिपाक्षीने जॅकलीनसाठी भेटवस्तू खरेदी केल्या. जॅकलीनला सुकेशच्या अटकेची माहिती मिळताच तिने ताबडतोब त्याच्याशी सर्व संपर्क तोडला.

दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी अभिनेत्री नोरा फतेहीची (Nora Fatehi) चौकशी केली होती. तर बुधवारी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची (Jacqueline Fernandez) आठ तास चौकशी केली होती. जॅकलीनला चंद्रशेखरची इतकी खात्री पटली होती की तिने त्याला ‘स्वप्नातील माणूस’ म्हटले होते. तसेच त्याच्याशी लग्न करण्याचा विचार करीत होती, हे विशेष...

जॅकलीनसाठी (Jacqueline Fernandez) हे प्रकरण अधिक त्रासदायक आहे. कारण, सुकेशचा गुन्हेगारी इतिहास माहीत असतानाही तिने त्याच्याशी संबंध तोडले नाही. नोराला सुकेशबद्दल संशय आला तेव्हा तिने स्वत:ला त्याच्यापासून वेगळे केले, असे रविंदर यादव यांनी मागे सांगितले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zakia Wardak: अफगाणिस्तानी अधिकारी करायची तस्करी, दुबईहून 19 कोटींचे सोने आणताना मुंबईत पकडले

'पवित्र ग्रंथ गुरु साहिब'ची पानं गुरुद्वारात घुसून फाडली! जमावाच्या बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू

Nick Jonas: देसी गर्ल प्रियांका चोप्राचा पती निक जोनासची तब्येत बिघडली; व्हिडीओ शेअर करत म्हणाला...

Job Discrimination : मुंबईत नोकरी, पण मराठी माणसालाच नो एन्ट्री? लिंक्डइनवरील पोस्ट होतेय व्हायरल

Latest Marathi News Live Update :उद्धव ठाकरे यांची आज अलिबागमध्ये सभा

SCROLL FOR NEXT