Jacqueline Fernandez Latest News Jacqueline Fernandez Latest News
मनोरंजन

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसची तब्बल ८ तास चालली चौकशी

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी जॅकलिन फर्नांडिसची दिल्ली पोलिसांची चौकशी संपली

सकाळ डिजिटल टीम

Jacqueline Fernandez Latest News मनी लाँड्रिंग प्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसची (Jacqueline Fernandez) दिल्ली पोलिसांनी सुमारे ८ तास चौकशी केली. पोलिसांनी जॅकलीनला २९ ऑगस्ट आणि १२ सप्टेंबरला बोलावले होते. मात्र, ती पोहोचली नव्हती. बुधवारी दिल्ली पोलिसांनी जॅकलीनला सुकेश चंद्रशेखरने (Sukesh Chandrashekhar) केलेल्या २०० कोटींच्या फसवणुकीबद्दल प्रश्न विचारले.

दिल्ली पोलिस आणि ईडी कथित प्रकरणाचा स्वतंत्रपणे तपास करीत आहेत. गेल्या महिन्यात ईडीने जॅकलीनला आरोपी केले होते. या प्रकरणात पोलिसांनी कारागृह अधिकारी, बँकर्स, खासगी व्यक्तींना अटक केली आहे. त्यांनी सुकेश चंद्रशेखरला मदत केली होती. आजपर्यंत पोलिसांनी जॅकलीनची चौकशी केली नव्हती.

सुकेश चंद्रशेखरसोबतचे तिचे नाते आणि दिलेल्या भेटवस्तूंबाबत दिल्ली पोलिसांनी जॅकलीनची (Jacqueline Fernandez) चौकशी केल्याचे वृत्त आहे. सुकेशला किती वेळा भेटली आहे आणि दोघांचे फोनवर किती वेळा बोलणे झाले, असे प्रश्न जॅकलीनला विचारण्यात आले. जॅकलीन फर्नांडिस फेब्रुवारी ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत सुकेशच्या संपर्कात होती.

सुकेश चंद्रशेखरने (Sukesh Chandrashekhar) दिल्लीतील व्यावसायिकाच्या पत्नीची २१५ कोटींनी फसवणूक केल्याचा आरोप आहे. त्यावेळी सुकेश दिल्लीच्या तुरुंगात होता. सुकेशने एकदा पंतप्रधान कार्यालय, कायदा मंत्रालय आणि गृह मंत्रालयाचे अधिकारी असल्याचे भासवून पैसे उकळले.

सुकेशने फोनवर दावा केला होता की तो पीडितेच्या पतीला जामीन मिळवून देईल. तसेच व्यवसायाला पुनरुज्जीवित करेल. जॅकलीनचे सुकेशसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले तेव्हा या प्रकरणाचा तपास सुरू होता.

फोटोंमध्ये दोघांमध्ये घट्ट नाते दिसत होते. मात्र, अभिनेत्री जॅकलीनने सुकेशशी कोणतेही संबंध नसल्याचे सांगितले होते. सुकेशच्या कोणत्याही कामात त्याच्यासोबत नव्हती, असेही म्हटले होते. त्याचवेळी सुकेशने ईडीला सांगितले की, दोघेही एकमेकांना डेट करीत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT