Jacqueline Fernandez withdrawn plea  esakal
मनोरंजन

Jacqueline Fernandez : जॅकलीनचं नेमकं काय सुरुयं? 'सुकेश' विरोधात पोलिसांकडे केलेली तक्रार घेतली मागे!

काही दिवसांपूर्वीच जॅकलीननं (Jacqueline Fernandez withdrawn plea) सुकेशच्या विरोधात दिल्ली पोलिसांकडे तक्रार केली होती.

युगंधर ताजणे, सकाळ ऑनलाईन टीम

Jacqueline Fernandez withdrawn plea : जॅकलीन फर्नांडिझ ही गेल्या काही महिन्यांपासून चर्चेचा विषय आहे. तिचा मित्र सुकेश चंद्रशेखरमुळे तिची डोकेदुखी वाढल्याचे दिसून आले आहे. सुकेशवर कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप असून तो सध्या तुरुंगात आहे. यात जॅकलीनची आणखी एक बातमी समोर आली आहे.

काही दिवसांपूर्वीच जॅकलीननं दिल्लीचे पोलीस आयुक्त संजय अरोडा यांच्याकडे सुकेशच्या विरोधात तक्रार दिली होती.तो मला जेलमधून त्रास देतो, त्याच्या मानसिक त्रासाला मी कंटाळले आहे. आपण या तक्रारीची तातडीनं दखल घ्यावी. अशी मागणी जॅकलीननं तिच्या तक्रारीतून केली होती.

आता जॅकलीननं तिची तक्रार मागे घेतल्याची बातमी समोर आली आहे. त्यामुळे चाहते अन् नेटकऱ्यांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. जॅकलीननं नेमक्या कोणत्या कारणामुळे तिची तक्रार मागे घेतली असा प्रश्न नेटकरी सोशल मीडियावरुन जॅकलीनला विचारत आहेत.

दोनशे कोटींच्या घोटाळ्याप्रकरणात सुकेश सोबत जॅकलीनचे नाव समोर आले होते. त्यानंतर तिची ईडीकडूनही चौकशी झाली होती. सुकेशनं जॅकलीनला काही भेटवस्तू दिल्याच्या बातम्या यापूर्वी व्हायरल झाल्या होत्या. त्यांचे काही फोटो देखील सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते. त्यामुळे जॅकलीन आणि सुकेशची मैत्री चाहत्यांना परिचित आहे. अशावेळी पोलिसांनी जॅकलीनकडे तपास करण्यास सुरुवात केली.

सुकेश आपल्याला धमक्या देत असून त्यामुळे मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत असल्याचे जॅकलीनचे म्हणणे होते. मात्र आता तिनं तिची तक्रार मागे घेतली आहे. दिल्लीतील कोर्टातून तिनं ही याचिका पुन्हा मागे घेतल्याचे सांगण्यात येत आहे.

नेमकं प्रकरण काय होतं?

जॅकलीनच्या त्या याचिकेवर कोर्टानं असं म्हटलं होतं की, अभिनेत्रीकडून जी याचिका दाखल करण्यात आलं होतं ते त्यांना पुन्हा परत करण्यात येत आहे. पहिल्या रिपोर्टमध्ये असे सांगण्यात आले होते की, सुकेश हा मीडियाला पत्र लिहित होता त्यावेळी जॅकलीनला असे वाटले की, त्या पत्रातून आपली प्रतिमा मलीन होत असून त्यातून काही वेगळे खुलासे समोर येतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Name Symbol Row : 'तृणमूल'मधील दोन्ही गटांना निवडणूक आयोगाची नवी ओळख; ममता गटाला फुटबॉलपटू, तर बंडखोर गटाला मिळाले 'लिफाफा' चिन्ह

Chandrashekhar Bawankule : दुष्काळावर शरद पवारांनी राजकारण करू नये; बावनकुळेंचे प्रत्युत्तर, म्हणाले ‘सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी’

Sunil Prabhu Car Accident: मोठी बातमी! ठाकरे सेनेच्या आमदाराच्या कारने पादचाऱ्याला उडवलं, एक जण जखमी

iPhone 18 Sale in India: पत्नीला iPhone 18 Pro द्यायचा होता; दिल्लीच्या व्यक्तीने चक्क सोनंच विकलं!

Marathi News Live Updates : शक्तिपीठ महामार्गात जाणाऱ्या जमिनींना बाजारमूल्याच्या चौपट मोबदला शक्य, शासनाकडून नियमावली जाहीर

SCROLL FOR NEXT