Jacqueline Fernandiz Allows travel aboard esakal
मनोरंजन

200 Crore Fraud Case : परदेशात जाण्यासाठी जॅकलीनला मिळाला 'ग्रीन सिग्नल'! कित्येक महिन्यांपासून सुरु होता संघर्ष

आता पटियाला हाऊस कोर्टानं विशेष न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी जॅकलीनला परदेशात जाण्यास परवानगी दिली आहे.

युगंधर ताजणे

Jacqueline Fernandiz Allows travel aboard : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिझ ही आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. महाठग सुकेश चंद्रशेखरची दोनशे कोटी रुपयांचा घोटाळा केल्याप्रकरणी ईडी चौकशी सुरु केल्यानंतर त्यात जॅकलीनचेही नाव समोर आले होते. यानंतर तिच्या चाहत्यांना मोठा धक्काही बसला होता.

आता पटियाला हाऊस कोर्टानं विशेष न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी जॅकलीनला परदेशात जाण्यास परवानगी दिली आहे. गेल्या काही महिन्यांपासून जॅकलीनला परदेशात जाण्यासाठी ईडीनं प्रतिबंध केला होता. त्यासाठी तिनं अनेकदा कोर्टाकडे दादही मागितली होती. आता कोर्टानं तिला परवानगी दिली आहे. याशिवाय ईडीच्या वकीलांकडून ज्या अटी आणि शर्ती जॅकलीनसाठी ठेवण्यात आल्या होत्या त्या रद्दही केल्या आहेत.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

जॅकलीनला तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी अमेरिकेत जाता येणार आहे. जेव्हापासून तिचे नाव सुकेश चंद्रशेखर सोबत घेतले जाऊ लागले तेव्हापासून त्यासगळ्या प्रकरणाचा तिच्या करिअरवर देखील परिणाम झाला होता. तिच्या हातून काही प्रोजेक्ट गेल्याची चर्चाही सुरु होती. अशातच जॅकलीननं तिला परदेशी शुटींगसाठी जाण्याकरिता न्यायालयाकडे परवानगी मागितली होती.

३७ वर्षांच्या जॅकलीनच्या याचिकेत दहा ते वीस ऑगस्ट दरम्यान अमेरिकेत जाण्यासाठी परवानगी मागितल्याचा उल्लेख आहे. पटियाला कोर्टाचे विशेष न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी जॅकलीनला तिच्या विदेश दौऱ्यासाठी परवानगी दिली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचे सुकेश चंद्रशेखरसोबतचे कनेक्शन समोर आल्यापासून ती कायदेशीर अडचणीत सापडली आहे. सुकेशने जॅकलिनला 10 कोटी रुपयांच्या भेटवस्तू पाठवल्याचं ईडीला आढळून आलं होतं. त्यानंतर ईडीने केलेल्या कारवाईत आतापर्यंत जॅकलिनची 7 कोटींहून अधिकची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. सुकेशने जॅकलिनच्या कुटुंबीयांना महागड्या भेटवस्तूही दिल्याचे तपासात समोर आले होते. यामध्ये कार, महागड्या वस्तू याशिवाय 1.32 कोटी आणि 15 लाख रुपयांच्या निधीचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

D Gukesh: ज्या कार्लसनने 'कमजोर' म्हणून हिणवलं, त्याच्याच नाकावर टिच्चून गुकेशनं 'रॅपिड' स्पर्धेचं जेतेपद जिंकलं

Nagpur News: ऐकावं ते नवलच! मृत व्यक्तीला दिलं रहिवासी प्रमाणपत्र; वाडी नगरपरिषदेच्या कारभारावर गंभीर प्रश्न

SCROLL FOR NEXT