Jagjit Singh
Jagjit Singh esakal
मनोरंजन

Viral: जगजित सिंग यांची बॉलीवूडनं कधीच किंमत ठेवली नाही, भाऊ करतार सिंग यांची खंत

सकाळ डिजिटल टीम

Viral News Releted Jagjeet Singh: आमची कधीच भांडणं झाली नाही. ते माझ्यापेक्षा वयानं 14 वर्षांनी ते मोठे होते. याउलट आमच्यात चांगले संभाषण व्हायचे. दिल्लीला आल्यानंतर ते आवर्जुन माझ्याकडे यायचे. त्यांना जोक ऐकणे खूप आवडायचे. त्यामुळे मला त्यांच्यासाठी खास जोक शोधावे लागायचे. मला ते नेहमीच वडिलासमान होते. त्यांच्याप्रती कायम आदर राहिला. बीबीसीनं घेतलेल्या मुलाखतीमध्ये जगजित सिंह यांचे बंधू करतार सिंह यांनी बॉलीवूडच्या वेगवेगळ्या गोष्टींना उजाळा दिला आहे.

जगजित सिंग यांनी न सांगता मुंबईला गेले, कुणाला सांगितलं नाही. शीख असून केसं कापली ते न सांगता, लग्न केले मुलगाही झाला मात्र कुणाला सांगितलं नाही. चित्रपटांमध्ये गाणं गायला नकार दिला. त्यावेळी धोका पत्करला. आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांनी रिस्क घेतली मात्र त्यात ते यशस्वी झाले. मात्र यासगळ्याचा कुटूंबाला मोठा धक्का बसला होता. आम्हाला खूप वेळ लागायचा हे सगळं स्विकारायला. पण जेव्हा सिंह यांचे नाव झाले तेव्हा सगळ्यांना गर्व वाटायचा.

ते मला नेहमी सांगायचे की तुझा आवाज चांगला आहे. फक्त तू रियाज कर. मात्र मी हे केले नाही. आता मला ते करावे लागले. पण त्याचे श्रेय त्यांना द्यावे लागेल. माझ्या दृष्टीनं माझा भाऊ हा नेहमीच माझ्यासाठी प्रेरणादायी राहिले आहे. पण त्यांना जे स्थान मिळायला हवे तेवढे मिळाले नाहीत. लोकांनी प्रेम दिले. मात्र इंडस्ट्रीनं दिले नाही. त्यांचा सन्मान झाला नाही. अशी नेहमीच खंत वाटते. त्यांना भारतरत्न देखील मिळायला हवा. असेही करतार सिंग यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

प्रसारणाचं धोरण नवं उत्तमातलं उत्तम हवं

सिक्स जी : भविष्यातली डिजिटल-क्रांती

SCROLL FOR NEXT