Jailer Trailer Release : esakal
मनोरंजन

Jailer Trailer : समोर शाहरुख असू द्या की अक्षय एकटा 'रजनीकांत' बस्स झाला!

गेल्या आठवड्यापासून बॉलीवूडमधील बिग बजेट चित्रपटांचे ट्रेलर प्रदर्शित झाले आहेत.

युगंधर ताजणे

Jailer Trailer Release : किंग खान शाहरुखच्या जवानचा ट्रेलर आला, बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमारच्या ओह माय गॉडच्या ट्रेलरनं हवा केली आहे. दुसरीकडे सनी देओलच्या गदरनं कमाल केली आहे. मात्र यासगळ्यात टॉलीवूडचे सुपरस्टार रजनीकांतच्या जेलरचा ट्रेलर समोर आला आहे. आणि त्यानं प्रेक्षकांना वेडं केलं आहे.

सोशल मीडियावर थलायवाचा चाहतावर्ग प्रचंड मोठा आहे. रजनीकांत यांना जगभरातून चाहत्यांचे मिळणारे प्रेमही मोठे आहे. त्यांचा एखादा चित्रपट जेव्हा येतो तेव्हा चाहते तो चित्रपट पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक असल्याचे दिसून येते. बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर त्यांचा जेलर नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असून त्याच्या ट्रेलरनं वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

गेल्या आठवड्यापासून बॉलीवूडमधील बिग बजेट चित्रपटांचे ट्रेलर प्रदर्शित झाले आहेत. त्यात गदर २, ओह माय गॉड२ आणि जवान सारख्या चित्रपटांचा समावेश आहे. काल प्रसिद्ध अभिनेता आयुषमान खुराणाच्या ड्रीम गर्ल २ चित्रपटाचा ट्रेलर समोर आला आहे. त्यालाही प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले आहे. यासगळ्यात मात्र चर्चा सुरु झाली आहे ती थलायवाच्या जेलरच्या ट्रेलरची.

वयाची सत्तरी पार केल्यानंतरही रजनीकांत यांचा जलवा कायम आहे. त्यांची ती स्टाईल, संवादफेकीची ढब, त्यांचे दिसणे कमालीचे प्रभावी आहे. जेलरमधून त्याची वेगळी झलक आपल्यासमोर येते. त्यामध्ये रजनीकांत यांनी एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली असून आपल्या धाडसी व्यक्तिमत्वाचा परिचय त्यांनी या जेलरच्या माध्यमातून करुन दिला आहे. प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध याच्या संगीतानं तर चाहत्यांना प्रभावित केलं आहे.

तुम्हाला माहिती आहे का, जेलर चित्रपटाचे पहिले नाव Thalaivar 169 असे होते. मात्र त्यानंतर मेकर्सनं हे नाव बदलण्याचा निर्णय घेतला. त्यांनी हा निर्णय रजनीकांत यांना ट्रीब्युट देताना घेतल्याची माहिती आहे. रजनीकांत यांची ही १६९ फिल्म असून त्याची आता चाहत्यांना कमालीची उत्सूकता असल्याचे दिसून आले आहे. रजनीकांत यांच्यासोबत या चित्रपटामध्ये राम्या कृष्णन दिसणार आहे. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.

रजनीकांत यांचा जेलर हा चित्रपट १० ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार असून त्यामध्ये जॅकी श्रॉफ, तमन्ना भाटिया, शिव राजकुमार, सुनील, योगी बाबू यांच्या भूमिका आहेत. यापूर्वी रजनीकांत आणि तमन्ना यांच्या कावाला गाण्यानं तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातल्याचे दिसून आले आहे. ते गाणे सोशल मीडियावर ट्रेडिंग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT