Jaineeraj Rajpurohit And Taarak Mehta Ka Ooltah Chashmah esakal
मनोरंजन

TMKOC : तारक मेहताची भूमिका 'हा' अभिनेता करणार? जेठलालला मिळणार नवीन मित्र

तारक मेहताची भूमिका 'हा' अभिनेता करणार?

सकाळ डिजिटल टीम

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Serial Updates : टीव्हीवरील आवडता शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या शोमधील सर्वच व्यक्तिरेखा लोकांना आवडतात. पण आता काही काळापासून कलाकार एकामागून एक हा शो सोडत आहेत. त्यामुळे शोच्या टीआरपीवर मोठा परिणाम होत आहे.

अलीकडेच तारक मेहताची भूमिका साकारणारा अभिनेता शैलेश लोढा (Shailesh Lodha) यांनी शो सोडला. त्यानंतर शोच्या निर्मात्याने सांगितले होते की, ते नवीन तारक मेहता घेऊन येणार आहे. अशा परिस्थितीत आता मालिकेला नवा तारक मेहता (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) मिळाल्याची बातमी येत आहे.

आता 'हा' अभिनेता तारक मेहताची भूमिका करणार

काही वृत्तांनुसार, शैलेश लोढा यांच्या जागी असित मोदीला नवीन तारक मेहता मिळाला आहे. सूत्रांचे म्हणणे आहे की तारक मेहता का उल्टा चष्माचे निर्माते अभिनेता जैनीराज राजपुरोहितला तारक मेहताच्या भूमिकेसाठी विचार केला जात आहे. मात्र, या निर्णयाबाबत निर्मात्यांनी कोणतेही अधिकृतपणे सांगितलेले नाही. (Entertainment News)

अभिनेता जैनीराज राजपुरोहित (Jaineeraj Rajpurohit) बालिका वधू, लगी तुझसे लगान आणि मिली जब हम तुम यासारख्या प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये दिसला आहे. या शिवाय त्याने ओह माय गॉड, आउटसोर्स्ड आणि सलाम वेंकी डेझी या चित्रपटांमध्येही काम केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russia Ukraine Ceasefire : रशिया-युक्रेन युद्धबंदीच्या ठरावादरम्यान भारत अनुपस्थित, अमेरिकेनीही घेतला नाही सहभाग; झेलेन्स्कींना झटका !

T20 World Cup: पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघाची देहबोली बदलली; सरावातही लक्षणीय बदल

Holi 2026: बरसाना विसरा! 'या' गावात महिला मारतात लाठ्या आणि पुरुष नाचतात साडी नेसून; लट्ठमार होळीचे हे ठिकाण माहीत आहे का?

Kolhapur Corporaters Dispute : कोल्हापूर महापालिकेत शारंगधर देशमुख-आदिल फरास यांच्यात जोरदार वाद, टेबल आपटण्याचा प्रकार; महापौरांनी केला हस्तक्षेप

UP Police: पोलिसांचा थरार! 'गो-तस्कर' कमरे हसनचा हाफ एन्काउंटर; अंधाराचा फायदा घेऊन ६ साथीदार पळाले

SCROLL FOR NEXT