jakkal new marathi web series of jio studios coming soon  sakal
मनोरंजन

'जक्कल'.. १९७० साली पुण्यात घडलेले भीषण हत्याकांड आता वेब सिरिज मधून..

जिओ स्टुडिओज घेऊन आले आहे एक दमदार मराठी वेब सिरिज 'जक्कल!’

नीलेश अडसूळ

marathi web series : जिओ स्टुडिओज लवकरच 'जक्कल' नावाची मराठी वेबसीरिज घेऊन येत आहेत. १९७० च्या दशकात पुण्यात घडलेल्या खळबळजनक हत्याकांडावर आधारित हा वेब शोअसून सामान्य मध्यमवर्गातील मुलं कळत नकळतपणे जेव्हा गन्हेगारीच्या मार्गावर वळतात आणि ते कोणत्या टोकाला जाऊ शकतात याचा शोध घेणारी ही वेब मालिका असणार आहे.

(jakkal new marathi web series of jio studios coming soon)

दिग्दर्शक विवेक वाघ यांची ही संकल्पना असून ते गेले ४ वर्षांपासून या विषयावर काम करत आहेत. विवेक वाघ यांना २०२० मध्ये याच विषयावर आधारित 'बेस्ट इन्वेस्टिगेटिव्ह डॉक्युमेंट्री' (Best Investigative Documentary) हा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. या मालिकेची निर्मिती ए कल्चर कॅनव्हास एंटरटेनमेंट प्रोडक्शनचे शिवम यादव आणि कार्तिकी यादव यांनी केली आहे.

या निमित्ताने बोलताना दिग्दर्शक विवेक वाघ म्हणाले “1976 ते 1977 ह्या काळात पुण्यासारख्या पेन्शनर आणि सांस्कृतिक शहरात दोन आणीबाणी लागू झाल्या एक दिल्लीची आणि दुसरी जक्कलची. आणि म्हणूनच खळबळ जनक हत्याकांड, क्रूर हत्या ह्या पलीकडे काय आहे जक्कल? जक्कल हे आडनाव आहे का ही वृत्ती ? आणि या मध्ये अडकलेल्या त्या १० निरपराध लोकांचं काय महत्वाचं म्हणजे एक कलाकार खुनी होता का एक खुनी दुर्देवीने कलाकार होता, ह्याचा धांडोळा जक्कल या मालिकेत करण्याचा प्रयत्न असणारं आहे.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

वन डे वर्ल्ड कप २०२७ साठी BCCI ने २० खेळाडू आधीच निवडलेत? IPL 2026 मध्ये त्यांच्यावर निवड समितीचे लक्ष

Nashik News : नाशिककरांनो लक्ष द्या! रमजान ईदनिमित्त उद्या वाहतुकीत मोठे बदल; 'या' मार्गांवर असेल प्रवेशबंदी

Ashok Kharat: कोट्यवधींची जमीन, आलिशान बंगला, फार्महाऊस… अशोक खरात १५ वर्षांत कसा बनला २०० कोटींचा मालक? कुंडली आली समोर

Bank Holiday: उद्या बँकांना सुट्टी? ईदमुळे 21 मार्चला तुमच्या शहरात बँका बंद की सुरू? पाहा RBI ची माहिती

'आमच्याकडे ‘जिन’ आहे, तो सर्व इच्छा पूर्ण करतो' म्हणत तरुणीची फसवणूक, अडीच वर्षांत १६ लाख रुपयांनी घातला गंडा

SCROLL FOR NEXT