Jalna Maratha Reservation Andolan Police Lathi Charge Ashwini Mahangade marathi actress Reaction  Esakal
मनोरंजन

Jalna Maratha Andolan: जालन्यातील लाठीमार प्रकरणी मराठमोळ्या अभिनेत्रीचा तिखट सवाल!

Jalna Police News : याबाबत ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली आणि सर्वांचे लक्ष वेधलं.

Vaishali Patil

Jalna Maratha Andolan : अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनात शुक्रवारी हिंसक वळण लागले आहे. तिथे दगडफेक झाल्याचा दावा करत पोलिसांनी आंदोलन करणाऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. यात तीस ते चाळीस आंदोलकांसह सुमारे वीस पोलिस जखमी झाले.

ही अत्यंत संतापजनक घटना असल्याच्या अनेक प्रतिक्रिया या घटनेनंतर आल्या. जालन्यात शनिवारी या घटनेच्या निषेधार्थ रास्तारोको आणि बंदची हाक देण्यात आली आहे. या घटनेनंतर सामाजिक, राजकीय नेत्यांनी देखील आपली प्रतिक्रिया देऊन संताप व्यक्त केला आहे.

त्यातच आता मराठी कलाकारांनी देखील पोस्ट शेयर करत या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे. याबाबत ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्री अश्विनी महांगडे हिने देखील सोशल मीडियावर पोस्ट शेयर केली आणि सर्वांचे लक्ष वेधलं आहे.

जालना लाठीचार्ज प्रकरणी अश्विनीने सोशल मीडियावर पोस्ट शेयर करत लिहिलं की, "मराठा आरक्षण आणि लाठीचार्ज…का? कशासाठी?" अत्यंत मार्मिक शब्दात तिने तिची प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला. अश्विनीबरोबरच अनेक असे मराठी कलाकार आहेत जे अशा काही घटना घडल्यास प्रतिक्रिया देतात. अश्विनी सोशल मीडियावर सक्रिय असते. ती नेहमी तिच्या परखड मतासाठी चर्चेत असते.(Latest Marathi News)

मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांनी २९ ऑगस्टपासून उपोषण सुरू केले होते. त्यांच्या या आंदोलनात जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्ह्यातील गोदावरीनदीकाठच्या सुमारे १३० गावांनी पाठिंबा दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री फडणवीसांच्या वर्षा निवासस्थानी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT