janhavi kushi 
मनोरंजन

जेव्हा अभिनेत्री जान्हवी कपूरला बहीण खुशी म्हणाली 'चालती हो इथून..'

सकाळवृत्तसेवा

मुंबई- लॉकडाऊनमुळे सध्या अनेक सेलिब्रिटी घरात राहुनंच कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. घरात राहुन कंटाळेले अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचा टाईमपास करण्याचे पर्याय शोधत आहेत. सेलिब्रिटींच्या बाबतीतही फार वेगळं काही घडत नाहीये. नुकताच अभिनेत्री जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांचा एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जान्हवी कपूर तिची लहान बहीण खुशीला त्रास देताना दिसत आहे. 

जान्हवी आणि खुशीच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये जान्हवी खुशीला विचारताना दिसत आहे की, खुशी १ ते १० च्या प्रमाणात सांग की आज तुला स्वतःला किती सकारात्मकता जाणवत आहे? यावर हुडीने पूर्ण चेहरा झाकलेल्या खुशीने तिला उत्तर दिलं, माझ्याशी बोलू नकोस. यावर जान्हवी पुन्हा म्हणाली, की तुला सकारात्मकता जाणवत आहे का? तु सकारात्मकता पसरवत आहेस का? यावर वैतागलेल्या खुशीने उत्तर देत म्हटलं, इथून निघून जा.

दोन्ही बहिणींचा हा मजेशीर व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.लॉकडाऊनमुळे खुशी आणि जान्हवी दोघीही घरात एकमेकींसोबत वेळ घालवत आहेत आणि एकमेकींसोबत मस्ती करत आहेत. काही दिवसांपूर्वी दोघीही टिकटॉक व्हिडिओ बनवताना दिसून आल्या होत्या.याशिवाय जान्हवीने तिची पेंटींगची कलाही लॉकडाऊन दरम्यान चाहत्यांसोबत शेअर केली होती. 

काही दिवसांपूर्वीच दोन्ही बहिणींचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये जान्हवीने सांगितलं होतं की तीच्या लहान बहीण खुशीला तिच्याआधी लग्न करायचं आहे इतकंच नाही तर दोघांमध्ये पहिली मुलं देखील खुशीला हवी आहेत.   

janhvi kapoor and khushi kapoor video goes viral over social media  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Overhead Cable : ओव्हरहेड केबल धोरणाला स्थायीची मान्यता; अनधिकृत केबल वर्षभरासाठी होणार नियमित

'ऑपरेशन टायगर'चा दुसरा भाग खरंच येणार? मंत्री प्रताप सरनाईक यांचा दावा की मिश्किल टिपण्णी? कैलास पाटलांबद्दल काय म्हणाले?

RBI चा मोठा निर्णय! 'ही' सुविधा वेळेआधी होणार बंद; ग्राहकांसाठी काय बदलणार? जाणून घ्या...

Ajinkya Rahane Exclusive : अजिंक्यचे भारताकडून खेळण्याचे स्वप्न पूर्ण होईल की नाही, याची भीती होती.. पण तो खचला नाही! राधिकाचे डोळे भरून आले, रहाणेने सावरले...

Devendra Fadnavis: महाराष्ट्रातील ३६,२११ कंपन्या बंद झाल्या? चर्चेवर देवेंद्र फडणवीसांचा खुलासा; शरद पवारांना सांगितलं सत्य

SCROLL FOR NEXT