Janhvi Kapoor Birthday knows about her property income film fees net worth sakal
मनोरंजन

Janhvi Kapoor Birthday: 26 वर्षाची जान्हवी आहे कोट्यवधींची मालकीण, एका चित्रपटासाठी घेते..

अभिनेत्री जान्हवी कपूरचा आज वाढदिवस..

नीलेश अडसूळ

janhvi Kapoor : बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूर नेहमीच आपल्याला सोशल मीडियावर सक्रिय पहायला मिळते. तिनं नेहमीच आपल्या इन्स्टाग्राम हॅंडलवर ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओ तसंच रील शेअर करत चाहत्यांचे मनोरंजन केले आहे.

जान्हवी कपूर नेहमीच आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत चांगल्या आणि निवडक भूमिका करताना दिसली. केवळ बॉलीवुडमध्येच नाही तर साऊथमध्येही तिचे खूप चाहते आहेत.

वडील बोनी कपूर आणि आई अभिनेत्री श्रीदेवी यांच्याकडूनच तिला कलेचा वारसा लाभला आहे. अशा जान्हवीचा आज 26 वा वाढदिवस. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्या संपत्ती विषयी..

(Janhvi Kapoor Birthday knows about her property income film fees net worth)

जान्हवीने आजवर अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'गुंजन सक्सेना', 'घोस्ट स्टोरीज', 'रूही' यांसारख्या हिट चित्रपटांमध्ये जान्हवी झळकली. तिच्या मिली या चित्रपटातील अभिनयाचं सर्वांनीच कौतुक केलं. जान्हवीचा दोस्ताना-2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

याशिवाय जान्हवी बऱ्याच जाहिरातीत देखील झळकली आहे. मीडिया रिपोर्ट नुसार जान्हवी एका चित्रपटासाठी जवळपास 5 कोटी मानधन घेते. तर जाहिरातीसाठीही ती कोटींच्या घरात मानधन घेते.

असं म्हणतात, जान्हवी सध्या 58 कोटींची मालकीण आहे. तसेच तिचे जुहूमध्ये आलिशान घर आहे. या घराची किंमत जवळपास 38 कोटी आहे. याशिवाय कोट्यावधी रुपयांच्या आलीशान गाड्या देखील तिच्याजवळ आहेत.  

जान्हवीच्या वडिलांनी देखील आपल्या मुलांसाठी बरीच संपत्ती कमावली आहे. मुंबईत अनेक ठिकाणी त्यांची महागडी घरे, गाड्या आणि विविध व्यवसायात गुंतवणूक आहे.

जान्हवी नव्या चित्रपटात कधी दिसणार याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. लवकरच ती 'जन गण मन' आणि 'बवाल' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नेहमीप्रमाणेच तिचे हेही चित्रपट वेगळ्या विषयाचे आणि हटके असतील असा चाहत्यांना विश्वास आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेटचा देव 'सचिन' जेव्हा फुटबॉलचा सुपरस्टार मेस्सीला भेटला, 10 नंबरची जर्सी देताना काळ थांबला… वानखडेवरील 'तो' क्षण Viral

Latest Marathi News Live Update: स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी वानखेडे स्टेडियममधून रवाना

Baramati Politics:'बारामतीत राष्ट्रवादी व भाजपचे परस्परांवर आरोप प्रत्यारोप'; उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोरील आंदोलनाचे उमटले राजकीय पडसाद..

Google Search : रात्रीच्या वेळेस पुरुष गुगलवर सगळ्यात जास्त काय सर्च करतात? 2025 च्या नव्या रिपोर्टने दुनिया हादरली

Raju Shetti: शक्तीपीठ महामार्ग रेटण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा अटापिटा: राजू शेट्टींचा आरोप; टेंडरसाठी बड्या कंपन्यांकडून घेतला ॲडव्हान्स ?

SCROLL FOR NEXT