jahnvi kapoor 
मनोरंजन

अरेरे! प्रमोशनची इतकी घाई की जान्हवीला कारमध्येच बदलावे लागले कपडे 

सकाळ ऑनलाइन

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरचा 'रुही' हा चित्रपट आज (११ मार्च) प्रदर्शित झाला. गेल्या काही दिवसांपासून जान्हवी या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. यासाठी जान्हवीला एकाच दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागत होतं. या व्यग्र वेळापत्रकामुळे तिला कपडे बदलण्यासाठीही वेळ मिळत नव्हता. म्हणून एका कार्यक्रमाला जाण्यापूर्वी तिने कारमध्येच कपडे बदलण्याचा निर्णय घेतला. 'अत्यंत आरामदायी दिवस होता' असं उपरोधिक कॅप्शन देत जान्हवीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. 

जान्हवीने पोस्ट केलेल्या पहिल्या दोन फोटोंमध्ये ती कार्यक्रमांसाठी पोझ देताना दिसतेय. तर तिसऱ्या फोटोमध्ये ती कारमध्येच कपडे बदलताना पाहायला मिळतेय आणि चौथा फोटो तिने विमानात बसलेला पोस्ट केला आहे. 

जान्हवीचा 'रुही' हा चित्रपट हॉरर कॉमेडी असून यामध्ये तिच्यासोबत राजकुमार राव आणि वरुण शर्मा मुख्य भूमिका साकारत आहेत. हार्दिक मेहता यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. जान्हवीने 'धडक' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट'चा हा हिंदी रिमेक होता. याआधी तिचा 'गुंजन सक्सेना' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील तिच्या अभिनयाला प्रेक्षक-समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. आता 'रुही'ला बॉक्स ऑफिसवर कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT