Janhvi Kapoor Varun Dhawan Bawaal Movie easkal
मनोरंजन

Janhvi-Varun Bawaal : 'तारीफ तुम्हारी बेशुमार करते है'! दोघांची 'केमिस्ट्री' रंगतेय

बवालच्या प्रदर्शनापूर्वी जान्हवीनं काही फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्याला मिळालेला प्रतिसाद तुफान होता.

युगंधर ताजणे

Janhvi Kapoor Varun Dhawan Bawaal Movie : वरुण धवन आणि जान्हवी कपूरच्या बवाल नावाच्या चित्रपटानं सध्या वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे. त्यात जान्हवीनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेयर केलेला तो फोटो दोघांबद्दल खूप काही सांगून जाणारा आहे. त्याविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाणही आले आहे.

बवालच्या प्रदर्शनापूर्वी जान्हवीनं काही फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्याला मिळालेला प्रतिसाद तुफान होता. त्या फोटोंमधील जान्हवी आणि वरुणची केमिस्ट्री रंगतदार असल्याच्या प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या होत्या. चित्रपटातून दोन्ही सेलिब्रेटींनी चाहत्यांचे निखळ मनोरंजन केले असून आगामी काळातील त्यांच्या प्रोजेक्टला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळेल असे बोलले जात आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

सोशल मीडियावर जान्हवी आणि वरुण यांच्या केमिस्ट्रीची जोरदार चर्चा रंगली आहे. काही नेटकऱ्यांनी त्यावर खुमासदार प्रतिक्रियाही दिल्या आहेत. त्या प्रतिक्रियेवरुन जान्हवी आणि वरुणविषयी वेगळ्या चर्चा सुद्धा रंगल्या आहेत. बवालमध्ये दोन्ही सेलिब्रेटींच्या अभिनयाचे कौतूक होत आहे. बऱ्याच दिवसानंतर वेगळ्या विषयावरील कलाकृतीला या दोन्ही अभिनेत्यांनी न्याय दिल्याच्या त्या प्रतिक्रियांनी नेटकऱ्यांचे लक्ष वेधले गेले आहे.

बवालनं प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाची चर्चा होती. पहिल्यांदाच वरुण आणि जान्हवी हे एकत्र काम करताना दिसत आहे. मेकर्सनं या चित्रपटाचं स्क्रिनिंग पहिल्यांदा दोन्ही सेलिब्रेटींच्या मित्र परिवारासाठी ठेवलं होतं. जेणेकरुन कोणत्याही प्रकारची चूकीची माहिती सोशल मीडियावर जाता कामा नये. यामुळे असा निर्णय घेतल्याची सुत्रांनी सांगितले.

जान्हवीच्या यापूर्वीच्या प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांनी मोठया प्रमाणात निराशा केली आहे. त्यामुळे तिच्या बवाल नावाच्या चित्रपटाकडून प्रेक्षकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. नुकत्याच या चित्रपटाच्या झालेल्या स्क्रिनिंगला बॉलीवूडमधील मोठमोठे सेलिब्रेटी उपस्थित होते. त्यामध्ये करण जोहर, जवानचे दिग्दर्शक एटली, अर्जून कपूर, पूजा हेगडे, तमन्ना भाटिया, नोरा फतेही, हुमा कुरेशी, नुसरत भरुचा यांचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईसह उपनगरात मुसळधार, अनेक भागात साचलं पाणी; लोकलसेवा विस्कळीत, पावसाचा जोर वाढणार

Monsoon Update: महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत मंगळवारपासून २९ ऑगस्टपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस, काय आहे हवामान खात्याचा अंदाज

Latest Marathi News Updates : सीएनजी ‘हायड्रो टेस्टिंग’चे दर तब्बल तिपटीने वाढले; चालकांमध्ये नाराजी

Annual Toll Pass:'टोलच्‍या वार्षिक पासवर पसंतीची मोहर'; देशात आठच दिवसांत पाच लाखांहून अधिक जणांकडे सुविधा, शासनाला मिळाला १५० कोटींचा महसूल

Ghati Medical College: ‘घाटी’तील ३५७ पदांसाठी अकरा शहरांत आजपासून परीक्षा; ‘टीसीएस’तर्फे २७ केंद्रांवर तीन सत्रांमध्ये नियोजन

SCROLL FOR NEXT