Janmashtami  Esakal
मनोरंजन

Janmashtami 2023: ड्रिम गर्ल ते बिग बी...'या' बॉलिवूड सेलिब्रिटींनी चाहत्यांना दिल्या जन्माष्टमीच्या शुभेच्छा

Vaishali Patil

Janmashtami 2023: आज सर्वत्र श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरा केली जात आहे. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमी तिथीला श्री कृष्ण जन्माष्टमी हा सण साजरा केला जातो. आजच्या दिवशी श्रीकृष्णाचा जन्म झाला. जन्माष्टमीचा सण आज देशभरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जात आहे.

या सगळ्यात कृष्ण जन्माष्टमीच्या निमित्ताने बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. सेलिब्रिटी श्रीकृष्ण भक्तीत लीन झालेले दिसले.

जन्माष्टमीच्या निमित्ताने बॉलीवूडचे शहंशाह अमिताभ बच्चन यांनी श्रीकृष्णाचा फोटो त्यांच्या ट्विट खात्यावर शेअर केला आहे. त्याने चाहत्यांना कृष्ण जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अमिताभ बच्चन यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "जन्माष्टमीच्या अनेक शुभेच्छा."

तर हृतिक रोशनने देखील चाहत्यांना कृष्ण जन्माष्टमीच्या खास शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबत त्याने X हँडलवर लिहिले, “श्री कृष्णाचे प्रेम, करुणा आणि कोमलता आपले जीवन उजळून काढेल. कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा. सुंदर लोक."

तर ड्रिम गर्ल हेमा मालिनी यांनीही कृष्णजन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हेमा मालिनी यांनी तिच्या घरच्या मंदिरातून कृष्णा आणि राधा राणीचा सुंदर फोटो शेयर केला आहे. त्याच्या सोषल मीडियावर पोस्ट शेयर करत त्यांनी लिहिले की, “माझ्या जन्माष्टमीच्या सजावटीची एक छोटीशी झलक तुम्हासाठी, जी मला दरवर्षी करायला आवडतं! मी राधारानी आणि कृष्णासाठी नवीन कपडे शिवते आणि त्यांना सजवते. यातून मला आनंद मिळतो. माझ्या घरी ही माझी स्वतःची पूजा आहे. सर्वांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा.

तर बॉलिवूडची पंगा क्विन कंगना राणौतनेही चाहत्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कंगना रणौतने चाहत्यांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दोतांना तिचा एक जूना फोटो शेयर केलाआहे. या फोटोसोबत तिने लिहिले की, "जन्माष्टमीच्या निमित्ताने द्वारकेला भेट देऊन परततानाचा फोटो, माझ्या भगवान कृष्णाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा."

तर विकी कौशल याने देखील छोट्या मुलांसोबत फोटो शेयर करत जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तर नयनताराने देखील तिच्या दोन्ही मुलांचा गोड फोटो शेयर करत सर्वाना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या .

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : पुण्यात प्रेशर मिड आणि प्लाझ्मा वर बंदी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा सुरू

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT