Jasmin Bhasin Esakal
मनोरंजन

Jasmin Bhasin: हे काय आता तू ही..जस्मिन भसीननं घातला बुरखा! नेटकऱ्यांनी झाडलं...

Vaishali Patil

टिव्ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री जास्मिन भसीन ही खुप चर्चेत असते. ती सध्या कुठल्याही मालिकेत किंवा शोमध्ये दिसत नाही. मात्र तिचे अल्बम प्रसिद्ध होत आहे. जस्मिन सोशल मिडियावर सक्रिय आहे.

जस्मिन नुकतीच सुट्टीसाठी दुबईला गेली होती आणि तिने तिच्या ट्रिपचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत. जस्मिन अबुधाबीतील शेख झायेद मशिदीतही गेली होती. तिने तिथला रील देखील इन्स्टावर शेअर केला आहे. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले असून तो पाहिल्यानंतर चाहत्यांनी तिला खुप ट्रोल केलं आहे.

तिला ट्रोल करण्यामागचं कारण म्हणजे ती अबू धाबीच्या शेख झायेद मस्जिदमध्ये जस्मिन हिरव्या रंगाचा बुरखा घालून दिसली होती. इंस्टाग्रामवर एक रीलही शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, "स्वर्गाचा एक बागिचा."

मात्र जस्मिनला हा रील शेअर करणं महागात पडल्याच दिसत आहे. काही नेटिझन्सनी तिला बुरखा घातल्यामुळे ट्रोल केले आहे, तर काहींनी तिचं समर्थनही केले आहे.

खरं तर जास्मिन भसीन ही तिच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत असते. अली गोनीला डेट करत आहे. दोघेही एकमेकांसोबत कपल गोल शेअर करतात त्याचबरोबर त्याचे फोटोज आणि व्हिडिओही सोशल मिडियावर व्हायरल होत असतात.

त्यातच जस्मिनला आता बुरख्यात पाहिल्यानंतर नेटकरी भडकले आहे.

कमेंट सेक्शनमध्ये यूजर्स जस्मिनला ट्रोल करत आहेत. काहींनी तिला बॉयकॉट करण्याची मागणी केली आहे तर काहींनी तुला अली गोनीने तुला हिजाब घालायला लावला का असा सवाल तिला विचारला आहे. तर काहींनी तिला अनफॉलो करण्याची मोहिमच सुरु केली आहे.

तर काहींनी तिच्या पोस्टचं समर्थनही केलं आहे. अनेक चाहत्यांनीही जस्मिनला पाठिंबा दिला आहे. एकाने लिहिले की, “मला समजत नाही की लोक अशा अनावश्यक नकारात्मक कमेंट्स का देत आहेत. तिने तिचं शरीर पूर्ण झाकलेल आहे, हे पचत नाहीये' अशा अनेक कमेंट तिच्या पोस्टला येत आहे. त्यामुळे सध्या जस्मिनची सोशल मिडियावर चर्चा सुरु झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT