Jasmine Bhasin Insta post holiday plans esakal
मनोरंजन

Jasmine Bhasin : चक्क दहा तास विमानातच बसून होती! एयरलाईनच्या ढिसाळ कारभारावर जस्मिन संतापली

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉसमधून अफाट लोकप्रियता मिळवलेली सेलिब्रेटी म्हणून जॅस्मिन भसीनच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.

युगंधर ताजणे

Jasmine Bhasin Insta post holiday plans : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि बिग बॉसमधून अफाट लोकप्रियता मिळवलेली सेलिब्रेटी म्हणून जॅस्मिन भसीनच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. गेल्या काही दिवसांपासून जॅस्मिन ही चर्चेत आली आहे. आता तिनं एका प्रसिद्ध एयरलाईन कंपनीवर संताप व्यक्त केला असून त्यामुळे आपला सुट्ट्यांचा आनंद संपून गेला असल्याचे तिनं म्हटले आहे.

खरं तर यापूर्वी देखील जॅस्मिनला एयरलाईन्सच्या ढिसाळपणाचा अनुभव आल्याचे दिसून आले आहे. आताही तिला अशाच प्रकारचा अनुभव आला असून तिनं तो चाहत्यांसमोर मांडला आहे. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी परदेशी चाललेल्या जॅस्मिनला संबंधित एयरलाईन्सच्या बेजबाबदार कृत्यामुळे चक्क दहा तास विमानातच बसून राहावे लागले आहे. माझ्या आयुष्यातील आतापर्यतचा विमान प्रवासाचा सर्वात वाईट अनुभव असे तिनं म्हटले आहे.

मुंबई वरुन जम्मुला जाण्यासाठी जॅस्मिन निघाली होती. मात्र त्यावेळी तिला त्या एयरलाईन्सकडून आलेल्या अनुभवानं त्रस्त केले. तिनं यासंबंधी इंस्टावर सविस्तर पोस्ट शेयर केली असून आपला त्रागा व्यक्त केला आहे. आपल्याला आलेला आजवरचा सर्वात वाईट अनुभव असे तिनं म्हटलं आहे. मला एक दोन नव्हे तर तब्बल दहा तास वाट पाहावी लागल्याचे तिने सांगितले आहे.

दुसरीकडे जॅस्मिननं केबिन क्रु मेंबर्सचं मदत केल्याबद्दल कौतुकही केल आहे. मात्र मॅनेजमेंट विभागावर तिनं राग व्यक्त केला आहे. आयएनएसच्या एका रिपोर्टनुसार, अभिनेत्री सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी मुंबईवरुन जम्मुला निघाली होती. त्याचवेळी तिला आलेल्या त्या अनुभवानं निराशेचा सामना करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Update: LPG कनेक्शनबाबत सरकारची मोठी अपडेट! 14.2 किलोच्या घरगुती सिलेंडरवर काय निर्णय?

Pancreatic Cancer Breakthrough: कॅन्सर उपचारात महत्त्वाची बातमी! पॅनक्रियाटिक कॅन्सरविरोधात मोठं यश; नव्या औषधाला FDAची मंजुरी

Blinkit-Zeptoवरून ५ किलोपेक्षा जास्त साखर मिळणार नाही! सणासुदीच्या तोंडावर ग्राहकांना झटका; Online खरेदीवर मर्यादा...

Marathi News Live Updates : 'लाडक्या बहिणींना' नागपूर महानगर पालिकेतर्फे रक्षाबंधनाची भेट

Mumbai Local: पार्किंगची फेररचना, नायगाव-भाईंदरमध्ये ३१ नव्या मार्गिका; रेल्वे प्रशासनाचा निर्णय

SCROLL FOR NEXT